दिनांक 1आणि 2 ऑक्टोबर 2023 रोजी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय अमरावती येथे राज्यस्तरीय आष्टेडू आखाडा स्पर्धा घेण्यात आली. ह्या स्पर्धेत महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांनी सहभाग घेत, जवळपास 750 विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून सर्वाधिक जास्त, म्हणजेच 80 विध्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये शिवकला, हस्तकला, पदसंतुलन, मर्दानी खेळ अश्या संपूर्ण कलांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात, चंद्रपूर जिल्ह्याला 17 (सुवर्णपदक), 12 (रजत पदक), 10 कास्यपदक, असे एकूण 39 पदकांची कमाई करता आली. आणि सर्वात जास्त पदक मिळवणारी टीम म्हणून, चंद्रपूर जिल्ह्याला भव्य चषक देऊन सन्मानीत करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांची सातारा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. ह्या सर्व विद्यार्थ्यांना जिंकविण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्याचे आष्टेडू मर्दांनी आखाडा सचिव -गुरु गणेश लांजेवार, उपाध्यक्ष गुरु कृष्णा समरीत, बल्लारपूर तालुक्याचे गुरु प्रशांत पिंपळे, गुरु अहमद सर, गुरु मनोज डे, गुरू -सिंधू खुशव्हा मॅम, वरोरा तालुक्यातील गुरु रवी चारुलकर, यांनी अतिशय परिश्रम घेतला.. तसेच 28 ऑक्टोबरला होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धाकरिता आष्टेडू मर्दानी आखाडा चे महाराष्ट्र सचिव महागुरु -राजेश तलमले सर , गुरु ऋषी सुपारे, तसेच चंद्रपूर जिल्हा आखाडाचे अध्यक्ष- गणेश तर्वेकर सर, सहसचिव -उदय पगाडे, कोषाध्यक्ष सचिन भानारकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत, पुढच्या वाटचालीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा दिल्या....