गडचिरोली,(जिमाका)दि.09: खरीप हंगाम 2022 मध्ये राज्यातील पेरणीची सद्यास्थिती बघता सोयाबीन बियाणे पेरणीबाबत शेतकऱ्यांना करावयाच्या आवाहनाचे ठळक मुद्दे पुढील प्रमाणे 75ते 100 मि.मि.पाऊस झाल्यानंतरच सोयाबिनची पेरणी करावी,प्रति हेक्टरी बियाणे दर 75 किलोवरुन 50 ते 55 किलोवर आणण्यासाठी टोकण पद्ध्तीने किंवा प्लॅटरचा वापर करुन पेरणी करावी, सोयाबीनची उगवणक्षमता 70 टक्केपेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे,पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करुन बियाणे सावलीत वाळवावे व नंतर त्याची पेरणी करावी.बियाण्याची पेरणी 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यत करावे.
शेतकऱ्यांनो खरीप 2022 मध्ये:- पेरणीसाठी स्वत:कडे उपलब्ध असलेले चांगले बियाणे पेरणीसाठी वापरा,पेरणीपुर्व बीजप्रक्रीया करावी,चांगली ओल म्हणजे 75 ते 100 मि.मि.पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यंत पेरणी करावी, असे आवाहन आयुक्त (कृषी) महाराष्ट्र राज्य धीरजकुमार यांनी केली आहे.