कारंजा (लाड) : काँग्रेसचे अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघाचे लोकप्रिय आ. धीरजजी लिंघाडे यांच्या स्थानिक विकास निधीतून 47 लक्ष रूपयाचा शैक्षणिक साहित्याचा [डिजिटल स्मार्ट पॅनल] लोकार्पण सोहळा दि. 22 डिसेंबर 2023 रोजी वाशिम येथे संपन्न झाला.
ह्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वाशिम जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा आमदार अमितजी झनक तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार धीरजजी लिंघाडे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप सरनाईक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भोजराज, जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते पांडुरंगजी ठाकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य किसनरावजी मस्के, वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादल चे जिल्हा समन्वयक अँड.संदेश जैन जिंतुरकर ,ॲड.अंभोरे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यकमाचे सूत्रसंचालन महादेवराव सोळंके तर आभार प्रदर्शन हरिष चौधरी यांनी केले.