वाशिम :नाभिक समाजाला सर्व दृष्टीने आरक्षण देण्याच्या विषया संदर्भात मंगळवार, दि. ०५ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १.०० वाजता दालन क्र. १०२ मंत्रालय मुंबई येथे सामाजिक न्यायमंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तर महाराष्ट्र नाभिक महामंडळचे अध्यक्ष कल्याणराव दळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थिति मध्ये बैठक पार पडली. यावेळी बैठकीला संबंधित खात्याचे सर्व सचिव, अधिकारी तसेच महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा आरक्षण समितिचे अध्यक्ष दामोदरराव बिडवे काका, सर्वभाषिक परिट धोबी समाज महासंघ महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष अनिलभाऊ शिंदे, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशसरचिटणीस पांडुरंगजी भवर, यूवक प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रभैया कावरे, अमरावती विभागीय अध्यक्ष गजाननभाऊ वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते. नाभिक आरक्षण समितिच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या बैठकीला फलित मिळाले व मंत्री धनंजय मुंडे यांनी नाभिक समाजाला (अनुसूचित) जाती प्रमाणे शैक्षणिक, सामाजिक व राजकीय आरक्षण मिळावे यासाठी स्वतंत्र अभ्यास गट स्थापन केला. येणाऱ्या काळात नाभिक समाजाला न्याय मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. अशी माहिती महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार समितीला प्राप्त झाल्याचे वृत्त राज्य माहिती अधिकार समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख असलेले संजय कडोळे यांनी प्रसार माध्यमाला दिले आहे .