वाशिम : १७ सप्टेंबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.या पंधरवड्याच्या अनुषंगाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सन २०२२ - २३ या वर्षात निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांना महाडीबीटी पोर्टल वापराबाबत आणि कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्यासाठी तालुकानिहाय पंचायत समिती सभागृहामध्ये कृषी अधिकारी (विशेष घटक योजना) यांचेमार्फत १४ ते १७ ऑक्टोबर दरम्यान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.१४ ऑक्टोबर रोजी पंचायत समिती सभागृह वाशिम येथे सकाळी ११ वाजता,१८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभागृह मालेगाव,१९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभागृह, रिसोड येथे,२० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभागृह मंगरूळपीर येथे,१४ ऑक्टोबर रोजी पंचायत समिती सभागृह मानोरा येथे आणि १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभागृह,कारंजा येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी संबंधित सर्व लाभार्थ्यांनी वरील कार्यशाळेला उपस्थित राहावे.असे आवाहन कृषी विकास अधिकारी विकास बंडगर यांनी केले आहे.