चंद्रपूर/मुल : दिनेश प्रकाश चलाख वय ३३ वर्ष, जात तेली धंदा राईस मिल ऑपरेटर रा. सिंतळा ता. मुल, जि. चंद्रपूर यांनी पो.स्टे. मुल येथे येवुन तोंडी रिपोर्ट दिला की, दिनांक १६/०३/२०२२ रोजी फिर्यादी व त्याचे सोबत अक्षय गोवर्धनरा. मुल मिळून मोटार सायकल क MH34-BY-7221 हिरो सुपर प्लेंडर नी मालक दिनेश गोयल यांची दुकानाची पोंभूर्णा, बल्लारशहा, राजूरा गडचांदूर, चंद्रपूर व चिचपल्ली येथून वसूली केलेली एकूण १८,९३,५२०/- रू ची रक्कम घेवून मुल येथे येत असताना रात्री ०८:४५ वा ते ०९:०० वा दरम्यान जानाळा ते डोणी फाटाजवळ मागून येणा-या मोपेड मोटार सायकल वरील दोन अनोळखी व्यक्तीनी कोणत्यातरी टणक वस्तूने अक्षय गोवर्धन याला जखमी करून त्यांच्या ताब्यातील १८,९३,५२०/- रू रक्कम जबरीने हिसकावून घेवून गेले. अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो.स्टे. मुल येथे अप. क. १५४/२०२२ कलम ३९४ भा.दं.वि. चा गुन्हा नोंद आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक साहेब चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पोलीस स्टेशन मुल करीत आहे.