कुरखेडा :- कुरखेडा ते देसाईगंज मार्गावरील विद्यानगर पुलावर म्हशीला टिप्परने जबर धडक दिल्याने म्हैस जागीच ठार झाली, तर टिप्पर अनियंत्रित होऊन पुलावरील कठडे तोडत खाली उतरला. यावेळी टिप्परवर बसलेले दोन इसम गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.
या अपघातात टिप्परवर बसलेले यशवंत नखाते (४५ वर्ष, रा. गेवर्धा) आणि लक्ष्मण नान्हे (४० वर्ष, रा. बोडधा) हे गंभीर जखमी झाले. मृत म्हैस ही कुरखेडा येथील विशालदेशमुख यांच्या मालकीची असल्याची माहिती आहे. गेवर्धा येथील हॉट मिक्स डांबर प्लांटमधील टिप्पर परत कुरखेडावरून देसाईगंज मार्गाने गेवर्धाकडे जात असताना हा अपघात घडला. दोन्ही जखमींना