बहुचर्चित "महा मिनिस्टर" कार्यक्रम हा, "झी मराठी" वाहिनीवरील फक्त महिलांसाठी विशेष कार्यक्रम आहे. ह्या रिऍलिटी शो मधील संपूर्ण सूत्रसंचालन प्रसिद्ध मराठी अभिनेता श्री.आदेश बांदेकर करीत असतात. प्रत्येक एपिसोड मध्ये, महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन, त्यातून उत्कृष्ट महिलांना पुढील एपिसोडसाठी निवड करण्यात येतो. एपिसोडमध्ये जिंकणाऱ्या महिलांना एक सुंदर पैठणी देण्यात येते. आणि अंतिम विजेत्याला ११ लाखाची पैठणी,व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येतो.
ह्या सुप्रसिद्ध "महा मिनिस्टर" कार्यक्रमात, ब्रम्हपुरी येथील कुर्झा वार्डातील प्रतिष्ठित व्यक्ती स्व.श्रीहरीजी शेंडे यांची मुलगी आणि भद्रावती येथील प्रतिष्ठित व्यक्ती स्व. मधुकरजी गायकवाड यांची सून सौ.सपना मिलिंद गायकवाड (शेंडे) हिने सहभाग घेऊन, सर्वोत्कृष्ठ ९० महिलांमध्ये येण्याचं मान पटकाविला. नागपूर मध्ये झालेल्या लाखो महिलांच्या ऑडिशन मध्ये, यांची निवड करण्यात आली, हेच विशेष. ह्या कार्यक्रमातील तिचा सहभागाचा लाईव्ह एपिसोड, सोमवार दिनांक.२० जून २०२२ रोजी दुपारी ठीक.१ वाजता (पून: प्रसारन) "झी मराठी" ह्या चॅनेल वर प्रसारित होणार आहे. त्यांच्या ह्या कामगिरीसाठी त्यांचा चाहतावर्ग, आणि नातेवाईक त्यांना सर्वत्र शुभेच्छा देत आहेत.