पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव पेरणे फाटा येथील विजय स्तंभाच्या शौर्य दिनानिमित्त रविवार १ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्रात सह देशाच्या अनेक राज्यातील आंबेडकरवादी नागरिक आणि भीमसैनिक पुणे येथील भीमा कोरेगाव पेरणे फाटा येथील विजय स्तंभाला नतमस्तक आणि अभिवादन करण्यासाठी 31 डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी २०२३ पर्यंत आपल्या वाहनासह येत असतात तेव्हा महाराष्ट्रासह देशातील येणाऱ्या भीमसैनिकांच्या वाहनांना महाराष्ट्र शासनाने संपूर्ण टोलमुक्ती करावी याकरिता बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रालय मुंबई येथे जाऊन निवेदन देऊन मागणी केली आहे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य परिवहन रस्ते विभाग आणि संबंधित येत असलेल्या अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत की पुणे भीमा कोरेगाव पेरणे फाटा येथे येणाऱ्या आंबेडकरवादी नागरिक व भीमसैनिकांच्या वाहनांना महाराष्ट्रात संपूर्ण टोल मुक्ती करावी असा आदेश द्यावा अशी मागणी बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे
तेव्हा १ एक जानेवारीला भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील आंबेडकरवादी नागरिकांनी व भीमसैनिकांनी आप आपल्या वाहनावरती प्रथमदर्शनी निळा ध्वज लावून यावे आणि कुठल्याही टोल नाक्यावरती टोल देऊ नये असे आव्हान बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे
भीमा कोरेगाव विजय स्तंभाची सर्व संरक्षण करण्याची जबाबदारी आणि १ जानेवारीला विजय स्तंभा जवळ होणाऱ्या शौर्य दिनाच्या कार्यक्रमाची सर्व जबाबदारी यावेळेस महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आली आहे तेव्हा महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुणे येथे येणाऱ्या भीमसैनिकांच्या वाहनांना सुद्धा टोलमुक्त करा
जर का यावर्षी भीमसैनिकांच्या वाहनांना टोलमुक्ती देण्यात राज्य सरकारने विलंब केल्यास आगामी काळात बहुजन जनता दल राज्य शासनाच्या विरोधात राज्यस्तरीय आंदोलन करणार असा इशाराही बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी दिला आहे.