कारंजा लाड -- वाहन चालकांवर अन्याय करणारा जुलमी नवीन मोटार वाहन कायदा रद्द करावा अशी मागणी काँग्रेस ने एका निवेदनाच्या माध्यमातून महामहीम राष्ट्रपती यांना केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सचिव दिलीप भोजराज यांच्या नेतृत्वात महामहीम राष्ट्रपती यांना तहसीलदारामार्फत दिलेल्या निवेदनात पुढे नमूद केले आहे कि केंद्रातील मोदी सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा हा वाहन चालकांसाठी अत्यंत कठोर व जुलमी आहे. या काळ्या कायद्यानुसार अपघात झाल्यास ट्रक चालकास दहा वर्षांची शिक्षा तसेच सात लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या काळ्या कायद्यांमुळे वाहन चालकांमध्ये तीव्र संताप असून टँकरचालकांनी नुकताच संप पुकारला होता, या संपाला काँग्रेसने आपला पाठिंबाही घोषीत केला होता. वाहन चालकांवर अन्याय करणारा जुलमी, अत्याचारी नवीन मोटार वाहन कायदा रद्द करावा अशी मागणी काँग्रेस ने केली आहे
दुचाकी वाहन, टॅक्टर चालवण्यासही चालकांना भिती वाटावी असा जुलमी, कठोर व अत्याचारी मोटर वाहन कायदा मोदी सरकारने आणला असुन या कायद्यामुळे स्वताचे वाहन चालवण्यासही लोकांना भिती वाटत आहे. आधीच्या कायद्यानुसार अपघात झाला तर १-२ वर्षांची शिक्षा व १ हजार रुपयांचा दंड होता पण नवीन कायद्यानुसार १० वर्षांपर्यंत शिक्षा व ७ ते १० लाख रुपये दंडाची तरतूद आहे तसेच हा कायदा आता अजामिनपात्र आहे.
या कठोर काळ्या कायद्याविरोधात जनतेत तीव्र नाराजी असुन हा काळा कायदा मंजूर करून घेण्यासाठीच मोदी सरकारने विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांना निलंबित केले. या काळ्या कायद्याला काँग्रेस पक्षाचा विरोध असुन हा काळा कायदा मोदी सरकार ने रद्द करावा अशी मागणी काँग्रेस ने केली आहे
निवेदन सादर करते वेळी कारंजा शहर काँग्रेस अध्यक्ष अमीर खान पठाण, ॲड. संदेश जैन जिंतुरकर, विठ्ठलराव अवताडे, ॲड. वैभव लाहोटी, अक्षय बनसोड, प्रफुल्ल गवई, नुरमहम्मद, सागर इंगळे, असलम खांन, अन्सार भाई उपस्थित होते