वाशिम : वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टी तथा मुसळधार पावसामुळे
कपाशीवर आकस्मिक मर (पॅरा वील्ट) हा रोग दिसून येत आहे. साधारणतः आकस्मिक मर ही पीक फुलोरा अवस्थेत तसेच बोंडं परिपक्व झालेले असताना अधिक प्रमाणात दिसून येते.
पावसाच्या मोठ्या खंडामुळे, कपाशी पिकास पावसाचा ताण बसल्यास व त्यानंतर लगेच मोठ्या पावसामुळे निर्माण झालेले जमिनीतील आर्द्रता व साचलेले पाणी यामुळे आकस्मिक मर कापूस पिकावर दिसून येते.
आकस्मिक मर या रोगामुळे कापसाच्या झाडातील तेजपणा नाहीसा होऊन झाड
एकदम मलूल तथा सुकल्यासारखे दिसते. तसेच त्यानंतर प्रादुर्भावग्रस्त कपाशीची सर्व पाने फुले
खालच्या दिशेने वाकतात किंवा पिवळे पडतात. तसेच पात्या, फुले व अपरिपक्व बोंडे सुकून
गळतात. अपरिपक्व अवस्थेतच बोडे उमलल्याचे आढळते. रोगट झाडाची मूळे कुजत नाहीत
रोगग्रस्त झाडास हमखास नविन फूट येते.
. आकस्मिक मरः उपाय योजना
• कापूस पिकाच्या वाढीच्या मुख्य अवस्थेत सिंचनाची सोय उपलब्ध असल्यास पाणी द्यावे.
पिकास प्रदीर्घ पाण्याचा ताण पडू देऊ नये..
अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी व साचलेले
पाणी चर काढून त्वरित शेताबाहेर काढून टाकावे.
• शेतातील पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
• आकस्मिक मर दिसलेल्या झाडाच्या मुळाशी खालील पैकी आळवणी
करावी. यासाठी खालील पैकी एका बुरशीनाशकाचा वापर करावा.
-> कॉपर ऑक्सीक्लोराइड (२५ ग्रॅम) किंवा कार्बेन्डाझीम (१० ग्रॅम) + युरिया (२००
ग्रॅम/ १० लीटर पाणी या प्रमाणात द्रावण करून प्रती झाडास २५०-५०० मिली
द्रावणाची झाडाच्या मुळाशी आळवणी करावी.
त्यानंतर ८ ते १० दिवसांनी २% डीएपी (२०० ग्रॅम / १० लि. पाणी) याची आळवणी
करून लगेच हलके पाणी द्यावे.
तूर पिकावर खोड माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास ५ % निंबोळी अर्क किंवा डायमेथोएट
३० % प्रवाही १५ मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. तूर पिकात शेंगा पोखरणारी अळीच्या प्रादुर्भावाचा आगाऊ अंदाज समजण्यासाठी हेक्टरी ५
कामगंध सापळे ५० मिटर अंतरावर शेतात उभारावेत. सोयाबीन पिकात स्पोडोप्टेरा अळीच्या उपद्रवाचा आगाऊ अंदाज घेऊन नुकसान टाळण्यासाठी हेक्टरी ५ स्पोडोलूरचा वापर करण्यात आलेले फेरोमेन सापळे नियंत्रणासाठी वापरावेत. मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीच्या १० % पेक्षा जास्त प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी क्लोरानट्रानीलीप्रोल १८.५ % एस. सी ०.४ मिली प्रती लीटर पाणी किंवा
स्पीनोटोराम ११.७ % एस सी ०.५ मिली प्रती लीटर पाणी किंवा इमामेक्टिन बेन्झोएट ५ %
एस जी ०.४ ग्राम प्रती लीटर पाणी वापरून फवारणी करावी.भुईमूग पिकावरील रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी फ्लुबेन्डामाइड ३.५% +
हेक्साकोनॅझोल ५% डब्ल्यूजी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.भात पिकावर काही ठिकाणी तपकिरी तुडतुडे आणि हिरवे तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव
दिसून येत आहे. प्रादुर्भाव दिसून येताच फिप्रोनिल ५% एस.सी. २० मि.ली. प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी पावसाची उघडीप पाहून करावी.शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन शेतात विविध ठिकाणी T आकाराचे पक्षीथांबे उभारावेत. असे कृषि उपसंचालक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांनी कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....