आरमोरी:-
दिनांक १६ एप्रिल २०२२ रोज शनिवारला सकाळी ८:०० ते १२:०० या वेळात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आष्टा,ता.आरमोरी येथे शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत प्रथम मेळाव्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.या मेळाव्याला शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष बाबूराव मोहुर्ले,सदस्य खटू गुरनुले,पोपेश्वर निखारे, मुख्याध्यापक श्री एम.एच पिसे सर,गट साधन केंद्र चामोर्शी येथील विषय साधनव्यक्ती सुनंदा गिरीपूंजे,शाळेतील शिक्षक प्रभाकर गडपायले,मदनराव उसेंडी,गायत्री वालदे,अनिल बुरले, अंगणवाडी सेविका वच्छला दामले,गावातील स्वयंसेवक, दाखलपात्र विद्यार्थी आणि त्यांच्या माता-पालक तसेच सर्व सदस्यगण आणि गावातील महिला-पुरूष युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान गावात जनजागृती रॅली काढण्यात आली,स्पीकर द्वारे दवंडी देण्यात आली.तसेच गावातील सर्व नागरिकांना शाळापूर्व तयारी अभियान मेळाव्याची माहिती व्हावी यासाठी शाळेत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.जून मध्ये होणाऱ्या दुसऱ्या मेळाव्याची माहिती देण्यात आली.स्मार्ट मातांची नेमणूक करून त्यांना विकास पत्र देण्यात आले.सोबतच मातांना प्रोत्साहन मिळावा यासाठी शाळेच्या वतीने मातांना सन्मानित करण्यात आले.
मेळाव्यामध्ये एकूण सात स्टॉल लावण्यात आले होते.यामध्ये विकास पत्र,विद्यार्थ्यांची नोंदणी.,शारीरिक विकास.,बौद्धिक विकास.,सामाजिक आणि भावनात्मक विकास
,भाषा विकास.,गणनपूर्व तयारी.,माता-पालकांना साहित्य वाटप व मार्गदर्शन केले.
शाळा पूर्व तयारी अभियान शाळा स्तर मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद,विद्यार्थी,गावातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवित सहकार्य केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....