अकोला:- वैद्यकीय विश्वातील अद्यावत तंत्रज्ञान,फिजिओथेरपीचा योग्य उपयोग व हिमोफिलिया रुग्णांची प्रबळ इच्छाशक्ती असल्यास हिमोफिलिया सारख्या गंभीर आजारावर निश्चितच मात करता येतो म्हणून असे वैद्यकीय उपक्रम समाज हितासाठी पोषक असल्याचे मत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी व्यक्त केले.जागतिक हिमोफिलिया दिनानिमित्त भारतीय रेडक्रॉस सोसायटी येथे मोफत हिमोफिलिया उपचार शिबिर संपन्न झाले. इंटास फाउंडेशन,इंडियन रेडक्रॉस सोसायटी,हिमोफिलिया सोसायटी वतीने व लिलाशंकर फाउंडेशनच्या सहकार्याने संपन्न या शिबिरात शिबिराचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी कुंभार बोलत होते.अश्या प्रकारच्या उपक्रमामुळे रुग्णांचे मनोधैर्य वाढून त्यांना या आजाराविषयी लढण्यासाठी मदत होत असल्याचे कुंभार यांनी यावेळी सांगितले. या शिबिरात हिमोफिलिया आजारा विषयी माहिती देऊन त्या विरोधात लढण्या साठी योग्य मार्गदर्शन करून रुग्णांना फॅक्टरचे वितरण करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर रेडक्रॉस चे सोसायटीचे चेअरमन डॉ किशोर मालोकार, वैद्यकीय अधिकारी डॉ श्यामकुमार शिरसाम, इंटास फाउंडेशनचे प्रकल्प सहयोगी निखिल वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.संचालन अश्विन दाते यांनी तर आभार कपिल रावदेव यांनी मानलेत.शिबिरास रेडक्रॉसचे मानद सचिव प्रभजित सिह बछेर, एड महेंद्र साहू, सीए मनोज चांडक,एड सुभाष मुंगी,अमर गौड,संदेश रांदड, डॉ तजीन सैय्यद, अरुधंती शिरसाट,प्रवीण ढोणे,नंदकिशोर पाथरीकर, पंकज राठी,निलेश देव,होमिओपॅथी तज्ञ डॉ संदीप चव्हाण,डॉ गजानन वाघोडे,डॉ सिमरनजित सिह बछेर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.शिबिराच्या सफलतेसाठी इंटास चे समुपदेशक कालिदास वडगे, प्रवीण गेडाम, अजय आत्राम, कार्तिक सहारे, प्रकल्प प्रमुख शर्मिला पारितोष सयाम, कृष्णा पुनगावकर, दिपाली पुणगावकर, मिलिंद गोतारकर, गजानन आगरकर आदींनी सहकार्य केले