अकोला- इंडीयन लॕंग्वेज न्यूजपेपर्स,दिल्ली या देशभरातील प्रकाशक संपादकांच्या राष्ट्रीय संघटनेची ७९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गोवा येथे संपन्न झाली.या सभेत अकोला येथील विश्वप्रभातचे संपादक व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक -राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांची संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पदाधिकारी म्हणून सर्वानुमते अविरोध निवड झाली आहे.यामुळे
प्रकाशजी पोहरेंसोबत ईलनाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील या नियुक्तीने अकोल्याला मिळालेली ही दुसरी संधी आहे.
गोवा येथे आरंबोलमधील ओजस्वी पॅराडाईज हॉटेलमध्ये ईलना अध्यक्ष मा.परेशनाथजी यांचे अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष जेष्ठ पत्रकार मा.प्रकाशजी पोहरे व व्दितीय उपाध्यक्ष राज्यसभा सदस्य मा.विवेकजी गुप्ता व निवडणूक निर्णय अधिकारी श्री विजयजी बोंन्द्रीया व पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा संपन्न झाली.यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष व इतर काही पदाधिकाऱ्यांच्या फेरनियुक्त्या करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
याप्रसंगी प्रकाश पोहरे यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करून कोरोना या जनतेला वेठीस धरणाऱ्या भयंकर षडयंत्राची माहिती दिली.या सभेत वृत्तपत्रांच्या व डीजीटल मिडीयाच्या समस्या व त्यांच्या निराकरणासंबंधी चर्चा करण्यात आली. अध्यक्षिय भाषणातून बोलतांना परेशनाथजी यांनी ईलनाकडून केन्द्रशासन व राज्याराज्यातील तक्रारीनुसार केन्द्र व राज्यशासनासोबत पत्रव्यवहारात करून आणि प्रसंगी न्यायालयीन केसेस दाखल करून संपादक,प्रकाशकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केले जातात.या विषयांना जास्तीत जास्त प्रसिध्दी देऊन त्याची कटींग फाईल तयार होण्यासाठी सर्वांनी योगदिन दिले पाहिजे असे आवाहन यावेळी केले. ईलना उपाध्यक्ष,राज्यसभा सदस्य विवेकजी गुप्ता यांनी न्यूज प्रिन्ट कागदाच्या भाववाढीसंदर्भात कारणांचे संशोधन करण्यात आले असता आयात करून साठेबाजी हे प्रमुख कारण असल्याचे व त्यासाठी आता जीएसटी नोंदणीनुसार आयात झालेला माल व त्याची प्रत्यक्ष झालेली विक्री यांची नोंदणी शासन करणार असल्याचे याप्रसंगी सांगीतले.यावेळी श्री किशनजी नागपाल यांच्या एक लाडकी या उपन्यासाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी नागपूरहून दैनिक राष्ट्रदुतचे व्यवस्थापकीय संपादक मा.शिव अग्रवाल,दैनिक राष्ट्रपत्रिकेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक,मा.किशनजी नागपाल भोपाळ येथील कृषीजगतचे संपादक मा.विजयजी बोंन्द्रीया,सातारा येथून दै.जिव्हाळाचे संपादक मा.बाळासाहेबजी आंबेकर,ईलनाचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी,सुप्रसिध्द कवी,चारोळीकार मा. अनंतराव खेळकर,बंगळूरू,कर्नाटक येथील विर राणी चन्नाम्माच्या संपादिका सौ.सरोजीनी आर्गे व त्यांचे सहकारी पत्रकार तथा अनेक राज्यांतील ईलना पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. देशभरातून आलेल्या सभासदांच्या सर्व सर्वांगसुंदर व्यवस्था ईलनाकडून करण्यात आली होती.
आपल्या प्रतिक्रिया द्या....