शहरातील बोर्डा येथील रहिवासी रीना संतोष मांडवकर वय 22 वर्षांनी काल पाच मार्च रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास आपल्या किरायाच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी घरमालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. व त्यांची न्यायालय कोठडीत रवानगी केली. धीरज उर्फ विकास मधुकर ढोक वय 36 वर्ष मधुकर मोतीराम ढोक 64 वर्ष, शितल विकास ढोक, वय २५ वर्ष रेखा मधुकर ढोक वय 62 वर्ष ,सोनू उर्फ श्वेता मधुकर ढोक वय 32 वर्ष अशी आरोपींची नावे आहेत.
अशोका वाटिकांमध्ये महिन्या आधी संतोष मांडवकर व मृतक रीना संतोष मांडवकर हे ढोक यांच्या घरी राहत होते. संतोष मांडवकर याचे बोर्डा चौकामध्ये हेअर सलून चे दुकान आहे दुपारच्या सुमारास जेवण करण्यासाठी संतोष गेला असता त्याला त्याची पत्नी रीना संतोष मांडवकर ही गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळले. आत्महत्या करण्यापूर्वी मृत्तकाने चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यामध्ये शितलच्या नावाचा उल्लेख केला असल्याचे पोलिसांनी सांगितले घटनेच्या आदल्या दिवशी रीना च्या घरी जुने घर मालक पती-पत्नीसह येऊन भांडण करून गेले या मानसिक त्रासाला कंटाळून रेणाने अखेर आत्महत्या केली.
पोलिसांनी 108,352,351(2),351(4),3(5) भारतीय न्याय संहिता अन्वे गुन्हा दाखल केला