कारंजा : कालचा पोळा झाल्यानंतर आज शनिवारी पोळ्याची कर म्हणजेच तान्हा पोळा असल्यामुळे लहान मुलंमुली यांच्या आनंद व उत्साहाला उधाण आल्याचे बघायला मिळाले. लहान मुलांनी आपले मातीचे आणि लाकडी बैल सजवून शेजारच्या ओळखीचे घरोघरी मुल जातांना दिसत होते . "बैलाची पूजा करा" म्हणून हाक देत होते . घरोघरी हळद, कुंकू, प्रसाद आणि खाऊला पैसे घेऊन आनंदी चेहरा घेऊन परतत होते . अशा रितीने आज लहान मुलांनी तान्हया पोळ्याचा सण साजरा केला.