तालुक्यातील सोळफाट्या या ठिकाणी दिनांक ०७ नोव्हेंबर २०२२ ला मौजे सोहळ व गायवळ येथील शेतकरी स्वयंसहायता बचत गट व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले नाल्याच्या आजूबाजूला असलेली माती रिकाम्या खताच्या पिशवीमध्ये भरून बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली पावसाळ्यात झालेल्या पावसाचे पाणी नाल्याद्वारे तसेच वाहून जात असते या पद्धतीने जर वनराई बंधाऱ्याचे बांधकाम केले तर नाल्यांमध्ये पाणी साचून आपण दुष्काळावर मात करू शकतो तसेच हे पाणी अडवल्यामुळे पशु प्राणी पक्षी जनावरे इत्यादी शेताला सुद्धा संरक्षण आपण करू शकतो या पाण्याद्वारे रब्बी मधील हरभऱ्याला तुरीला किमान दोन पाणी आपण या द्वारे देऊ शकतो त्यामुळे सर्व शेतकरी बंधूंनी अशा प्रकारचे बंधारे तयार करावे जेणेकरून पाणी वाहून न जाता ते आढळून जमिनीमध्ये मुरून पाण्याच्या पातळी वाढ होते बंधारे बनवण्यासाठी गावातील तरुण व शेतकरी बचत गटातील प्रतिनिधी व कृषी विभागातील कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली यावेळी गटाचे प्रतिनिधी म्हणून ज्ञानेश्वर वैजनाथ गीते भगवान बाबा स्वयंसहायता शेतकरी बचत गट रमेश रामराव मार्गे गहिनीनाथ शेतकरी स्वयंसहायता बचत गट व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वयंसहायता बचत गट मनोज विठ्ठल इंगळे व गावातील प्रतिष्ठित नागरिक शंकरराव वरागडे गोपाल सोळंके तसेच तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्रीमान संतोषजी चौधरी मंडळ कृषी अधिकारी रवींद्रजी जटाळे कृषी प्रवेक्षक गुणवंतराव ढोकणे कृषी सहायक मंगेश सोळंके, प्रवीण जटाळे, नरेंद्र फुके गावातील प्रथम नागरिक सतीश पाटील राऊत सरपंच गायवळ सोहळ सरपंच अरुण बापू देशमुख इत्यादी उपस्थित होते गायवळ गावांचे सरपंच यांनी सगळ्यांचे आभार व्यक्त केले