वाशिम : लोकसभा निवडणूका संपुष्टात येवून सध्या राज्यात चोहीकडे विधानसभा निवडणूक वारे वाहायला लागले आहे.या संदर्भात आमचे कारंजा येथील प्रतिनिधी आणि महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष असलेले,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कारंजा विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतांना स्पष्ट सांगितले की,गेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये असलेली महायुती आणि महाविकास आघाडी यापुढे अंतर्गत कलहामुळे कायम रहाणार नसून,सर्वच राजकिय पक्ष स्वबळावर निवडणूक लढविण्याचा अंदाज आहे. शिवाय विधानसभा निवडणूकीत सर्वच पक्षात प्रचंड प्रमाणात बंडखोरी होणार आहे.हीच परिस्थिती राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात अनुभवायला मिळणार आहे. यामध्ये कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाबद्दल बोलायचे झाल्यास,कारंजा मानोरा विधासभा मतदार संघावर,स्थानिक नेत्यांना डावलून येथे आजूबाजूच्या बाहेरच्या नेत्यांच्या नजरा नेहमीच लागलेल्या असतात.शिवाय येथील स्थानिक नेते कार्यकर्त्यांचा बाहेरचे नेते कळसुत्री बाहुल्या प्रमाणे उपयोग करीत असतात. माझ्यामते सध्या कारंजा मानोरा विधासभा मतदार संघावर दावा करण्याकरीता राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (उबाठा),भाजपा हे प्रमुख पक्ष पुढे सरसावणार असून राष्ट्रिय काँग्रेस तर्फे सुनिल पाटील धाबेकर,राष्ट्रवादी (अजित पवार) कडून श्रीमती सईताई डहाके,शिवसेना (उबाठा) कडून अनिल राठोड आणि भाजपाकडून आमदारपुत्र ज्ञायक पाटणी,अमोल पाटणकर किंवा राजु पाटील राजे यांना उमेद्वारी मिळण्याकरीता दावेदारी केली जाऊ शकते.यातही महत्वाचे म्हणजे मतदाराकडून स्थानिक उमेद्वारासाठी कितीही आरडा ओरड केली जात असली तरी, स्थानिक उमेद्वाराचा हा मुद्दा केव्हाच मागे पडला असून, राजकिय पक्ष आपआपली पोळी भाजून घेण्याकरीता स्वमर्जीने उमेद्वारी देणार आहेत.माजी आमदार प्रकाशदादा डहाके आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्या अकाली मृत्युमुळे हा मतदार संघ पोरका झालेला असून आता मतदार संघाला जसे हवे तसे नेतृत्व ऊरलेले नाही. त्यामुळे स्थानिक मतदाराकडून कतृत्ववान नेतृत्व म्हणून कारंजा मानोरा मतदार संघाला कर्मभुमी माणणाऱ्या सुनिल पाटील धाबेकर यांचेकडे आशावाद म्हणून पाहीले जात आहे.शिवाय कारंजा विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व यापूर्वी योजना महर्षी स्व.बाबासाहेब धाबेकर यांनी केलेले असल्यामुळे आजही त्यांच्या हजारो कार्यकर्त्याचा गोतावळा सहकार नेते सुनिल पाटील धाबेकर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे.त्यामुळे सुनिल पाटील धाबेकर यांना राष्ट्रीय कॉग्रेसने उमेद्वारी जाहिर केली तर मराठी,कुणबी, बंजारा,मुस्लिम,गवळी समाज सुनिल पाटील धाबेकर यांचे सोबत भक्कम ताकदीने एकवटणार आहे.तर माजी आमदार स्व.प्रकाशदादा डहाके यांच्या निधनानंतर त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सईताई डहाके यांनी बाजार समितीचे सभापतीपद उत्कृष्टपणे सांभाळून त्यांच्या कार्यकर्ते चाहत्यांना मजबूतपणे एकत्रीत ठेवून स्थानिक सहकार क्षेत्र व स्वराज्य संस्थामध्ये आपले वर्चस्व कायम ठेवलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्या उमेद्वारीच्या भक्कम दावेदार मानल्या जातात.तसेच कारंजा मानोरा मतदार संघातील बंजारा समाजाचे शिवसेना (उबाठा) गटाचे नेते अनिल राठोड यांनी, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत शिवसेना (उबाठा गटाचे) नेते माजी मंत्री तथा विद्यमान खासदार संजयभाऊ देशमुख यांना उमेद्वारी मिळाल्यापासून तर विजय प्राप्ती पर्यंतची महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे.त्यामुळे अनिल राठोड हे देखील शिवसेना (उबाठा) कडून महत्वाचे दावेदार मानले जातात.भाजपा पक्षाकडून मात्र अनेक इच्छुक उमेद्वार असून त्यांनी आपआपल्या परीने उमेद्वारी मिळविण्याकरीता प्रयत्न सुरू केलेले आहेत.भाजपापक्षाकडून आमदारपुत्र ज्ञायक पाटणी, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे माजी अव्वल सचिव अमोल पाटणकर,शिवसेना नेते राजु पाटील राजे हे दावेदार मानले जातात.नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये असे दिसून आले की,सध्या मतदार राजा महायुतीवर नाराज असून त्यांचा विश्वास महाविकास आघाडीकडे वळला आहे.त्यामुळे यंदा कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील खरी लढत राष्ट्रीय काँग्रेस-राष्ट्रवादी (अजित पवार)-शिवसेना (उबाठा) म्हणजेच सुनिल पाटील धाबेकर, श्रीमती सईताई डहाके,अनिल राठोड यांच्यामध्ये तिरंगी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नेमकी ही लढत तिरंगीच होणार की चौरंगी लढत होणार तसेच तिन्ही पक्षांना मागे सारून , गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेला चौथा पक्ष भाजपाच निर्विवाद विजय संपादन करणार.हे येणाऱ्या काळात बघावे लागणार आहे.शिवाय विधानसभेच्या रणमैदानात आमदार बच्चु कडू यांची प्रहार संघटना,वंचित बहुजन आघाडी, मनसे, इत्यादी प्रादेशिक पक्षांचा आणि बंडखोरी करून अपक्ष उमेद्वारी दाखल करणाऱ्या उमेद्वाराचा सहभाग सुद्धा मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.त्यामुळे कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील मतदार नेमका विजय कुणाचा करणार हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे.असे वृत्त मतदाराचा कौल पहाता,ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे.