कारंजा : शिक्षण क्षेत्राला आज सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजून शिक्षणाचा काळा बाजार मांडला गेल्याचे कटूसत्य असून, नागरिकांचा ओढा नगर पालिका, जिल्हा परिषद शाळा सोडून, खाजगी शैक्षणिक संस्थाकडे जातो आहे.जणू काय खाजगी शिक्षण संस्थामधून बाहेर पडताच आपली मुले इंजिनिअर,डॉक्टर्स, अँडव्होकेट होऊन बाहेर पडतात. असेच पालकांना वाटत असावे. आणि म्हणूनच लाखो रुपये देणगी देण्यासही हे गर्भश्रीमंत नागरीक मागेपुढे पहात नाहीत. परंतु तुमच्या मुलांना विद्यादान करणारे गुरुजन आजच्या शिक्षीकाची शैक्षणिक पात्रता आहे काय ? याकडे मात्र आपण लक्ष्य देत नाही.तरी यापुढे आपल्या मुलाचे भवितव्य घडविणाऱ्या शिक्षिकांची शैक्षणिक योग्यता काय आहे ? हे आपण माहिती अधिकाराद्वारे संबधित शैक्षणिक संस्थेकडून जाणून घेतले व शैक्षणिक संस्थाचा कारभार अनागोंदी मनमानी दिसत असला तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या शिक्षणाधिकार्याकडे आपण रितसर तक्रार केली तर शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचारावर वचक बसून,पुढच्या पिढीला चांगले शिक्षण मिळू शकणार असल्याचे मत सर्वसाधारण नागरिकांनी व्यक्त केले आहे.