ब्रम्हपुरी/प्रतिनिधी:--हनुमान मंदिर देवस्थान पेठ वार्ड ब्रम्हपुरी च्या वतीने कार्तिक गोपाल काल्याचे निमित्याने वार्डात विविध कार्यक्रम घेण्यात आले. वंदनिय राष्ट्संत तुकडोजी महाराज व संत गाडगे बाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पेठ वार्ड परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.तसेच ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी यांचे वतीने 18 वर्ष वयोगटावरील महिलांचे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबिरात रक्तदाब, मधुमेह व इतर तपासण्या करून गरजू रुग्णांना औषधीचे वितरण करण्यात आले. कार्तिक गोपालकाला सायंकाळी कार्यक्रम मोठया उत्साह पार पाडण्यात आला. व भाविक भक्ताना महाप्रसाद वितरण करण्यात आले व काकड आरती करीत सदैव सहकार्य करणारे काशीनाथ दोनाडकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. रात्रौ10 वाजता मनोरंजना करिता संगीत"वणवा"या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.

नाटकाचे उद्घाटन प्रमोदभाऊ चिमुरकर माजी जी प सदस्य , व अध्यक्ष म्हणून महेश भर्रे नियोजन सभापती तथा नगरसेवक ब्रम्हपुरी, प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका सौ. अंजली अनंता उरकुडे, प्रभाकर पारधी, प्रा. डाँ. सालोडकर ,विनोद झोडगे, अविनाश राऊत, पत्रकार गोवर्धन दोनाडकर,लोमेश तोंडरे,संभाजी ढोगे, व अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप राऊत, संचालन भास्कर उरकुडे तर आभार अविनाश राऊत यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे अनुशंगाने विविध श्रेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्तिकी गोपालकालाच्या विविध प्रकारच्या कार्यक्रमाला कैलास पिलारे, दिवाकर कुथे,संजय प्रधान, ओमप्रकाश उरकुडे, प्रदीप उरकुडे, विकास ठाकरे, ईश्वर प्रधान, विशाल राऊत, मंगेश गोंगल, योगेश बोकडे, कुणाल भगत, परिमल उरकुडे, श्रीकांत बगमारे,प्रकाश कुथें, गंगाधर पिलारे सर, अतुल हजारे, प्रमोद कुथें,लोकेश भर्रे,अतुल भोयर, बालु भागडकर, अरुण प्रधान, शंकर डोईजड व सर्व वार्ड वासीयांनी मोलाचे सहकार्य केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....