ब्रह्मपुरी
तालुक्यातील निलज येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निलज येथे 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय मुलांच्या सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतीक कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून. अन्नाजी ठाकरे बाबुसाहेब रुई, उपस्थित होते.
या कार्यक्रमाला सहउद्घाटक म्हणून उत्तमजी बनकर संचालक हे.स.सं.रुई, उपस्थित होते.या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष मणुन. हेमंतकुमार ठाकरे सरपंच ग्रा.प.निलज, तर प्रमुख मार्गदर्शक. रविंद्रजी घुबडे सहा गट.अधि.पं.स.ब्रम्हपुरी,विशेष अतिथी.अशोकजी भुते अध्यक्ष शा.व्य.स.निलज,शंकरजी कोपुलवार उपसरपंच निलज,धर्मपालजी राहाटे सदस्य,सौ.प्रियाताई ढोरे ग्रा.प.सदस्या,सौ.जान्हवीताई पिलारे ग्रा.प.सदस्या,सौ.कल्पनाताई मांढरे ग्रा.प.सदस्या,सौ.माधुरीताई मांढरे ग्रा.प.सदस्या,तलमले ग्रामसेवक निलज,रविंद्रजी ढोरे मा.सरपंच खरकाडा,विनोदजी चौधरी वार्ताहर निलज,पांडूरंगजी दोनाडकर मा.पो.पा.निलज, आदी उपस्थित होते.
या सांस्कृतीक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, २६ जानेवारी रोजी स्वतंत्र भारतात संविधान लागू करण्यात आले आणि देशाला धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. संविधानाच्या माध्यमातून भारतातील सर्व नागरिकांना समानता, स्वातंत्र्य आणि न्याय सुनिश्चित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. शालेय मुलांच्या सांस्कृतीक कार्यक्रमाच्या माध्यमातुन मुलांच्या उपजत कलागुणांना वाव मिळणार आहे.
या सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निलज येथील चिमुकल्यांनी हिरहिरीने सहभागी होत. देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करीत गावकऱ्यांचे मन मोहून घेतले. या शालेय मुलांच्या सांस्कृतीक कार्यक्रमात मोठया संख्येने गावातील नागरिक, पालक व शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....