कारंजा:- 15 ऑगस्ट 2024 रोजी कारंजा व मानोरा येथील तिरंगा बाईक रॅलीत नागरिकांनी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फार मोठया संख्येने भाग घेत ॲड.ज्ञायक पाटणी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत सहभागी झालेत हजारोच्या संख्येने बाईक रॅलीत सहभाग घेतलेल्या नागरिकांनी त्यांच्या दुचाकी वर तिरंगा झेंडा लावला. दुर दुर सर्वत्र तिरंगा झेंडा आणि नागरिकासह बाईक,बाईकच दिसत होत्या. लोकांनी त्यांच्या घरावर झेंडे लावलेत. पाटणी यांच्या नियोजनातून संपूर्ण शहर तिरंगामय करण्याचे कार्य भाजपा पदाधिकारी यांनी केले रस्त्यावरील दर्शनी स्थळी, विद्युतपोल सह इतरत्र ठिकाणी तिरंगा झेंडा लावला.या तिरंगा बाईक रॅलीत कारंजा मानोरा तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन युवा नेते ॲड.ज्ञायकजी पाटणी यांनी केले होते. या
रॅलीचा शुभारंभ पोहरादेवी येथून करण्यात आला. मानोरा येथील रॅली पोहरादेवी ,पंचाळा फाटा ,हातना,माऊली , मानोरा शहर,कुपटा,दापुरा , इंझोरी मार्गे कारंजा आणि कारंजा येथील रॅलीचा शुभारंभ ॲड. ज्ञायक राजेंद्र पाटणी यांचे जन संपर्क कार्यालयापासून ते झाशी राणी चौक ते शिवाजी नगर ,जयस्तंभ चौक, मेन रोड ,महात्मा फुले चौक , हटोटीपुरा ,विठ्ठल मंदिर ,गुरुमंदिर रामा सावजी चौक ते झाशी राणी चौक असा करण्यात आला झासी राणी चौकातुन पुढे ही रॅली मानोरा रोड वरील विद्यारंभ शाळेच्या परीसरात पोहचली . येथे ॲड. ज्ञायक पाटणी यांनी स्व. राजेंद्र पाटणी यांच्या स्मृतींना उजाळा देत स्वातंत्र्य दिनाच्या उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्यात. पोहरादेवी येथून शुभारंभ झालेल्या भव्य तिरंगा बाईक रॅलीने मानोरा मार्गे मार्गक्रमण करत कारंजा येथे समारोप केला. या रॅलीला कारंजा-मानोरा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला आणि उपस्थिती दर्शवली .या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल कारंजा-मानोरा मतदारसंघातील सर्व जनतेचे मनःपूर्वक आभार त्यांनी यावेळी मानलेत. या तिरंगा बाईक रॅलीत भाजपा मानोरा तालुका अध्यक्ष ठाकूरसिंग चव्हान, भाजपा कारंजा शहर अध्यक्ष ललित चांडक, मानोरा शहर अध्यक्ष राजेंद्र देशमुख आदींसह कारंजा मानोरा येथील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते , स्थानीक स्वराज्य संस्थेचे लोक प्रतिनिधी , भाजपा आघाडी, भाजपा मोर्चा , महीला आघाडी,पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . तिरंगा बाईक रॅलीच्या यशस्वीते करिता कारंजा ,मानोरा भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले . विद्यारंभ शाळेच्या परिसरात ॲड. ज्ञायक पाटणी यांचे स्वीयसहाय्यक सुभाषभाऊ सुरूसे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला असे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख यांनी कळविले.