गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणेशाचे आगमन होते आणि वातावरण चैतन्याने भरून जाते. लहान मुलांना संगीत, नृत्य, नाटक, कला आणि साहित्य यासह विविध क्षेत्रांमध्ये त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी असे सांस्कृतिक कार्यक्रम एक व्यासपीठ प्रदान करतात. हे सण विद्यार्थ्यांमध्ये समाजाची भावना निर्माण करण्यास आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला उत्तेजन देण्यासही मदत करतात व अश्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळते. असे मत माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी व्यक्त केले.
ब्रम्हपुरी तालुक्यातील अड्याळ (जाणी) येथील न्यू संमिश्र गणेश मंडळ यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विनोद धोंगरे हे उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे उपाध्यक्ष म्हणून गणेश घोरमोडे तर प्रमुख अतिथी म्हणून घनश्याम भोयर, मोतीराम इंगुलकर, भगवान रोबाडे, हिरालाल इंगुलकर , नरेंद्र खानोळकर सो.सा.उपाध्यक्ष,चिलबुलेजी,यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये गावातील लहान मुलांनी आपल्या कलेचे प्रदर्शन केले. गावातील जनतेने त्यांच्या कलागुणांना दाद देत प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यू संमिश्र गणेश मंडळ, अड्याळ (जाणी)च्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले._