कारंजा (लाड) : (जिल्हा प्रतिनिधी सजय कडोळे) अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक किसन मुळे यांनी आज कारंजा तालुक्यातील दोनद येथे कृषी संजीवनी सप्ताह निमित्त शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन बाळाराम शेतकरी बचत गटातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अमरावतीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ राहुल सातपुते, अमरावतीचे उपविभागीय कृषी अधिकारी डॉ.चेडे,वाशिमचे कृषी उपसंचालक शांताराम धनवडे,वाशिमचे तंत्र अधिकारी दिलीप कंकाळ व कारंजा तालुका कृषी अधिकारी संतोष चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी दोनद येथील शेतकरी तसेच कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता.फार्मर कप स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या गटाने विविध उपक्रम राबविले.त्याची पाहणी यावेळी मुळे व अन्य कृषी अधिकाऱ्यांनी केली.