चंद्रपूरच्या रिक्त तहसीलदारपदी वर्धा येथील नायब तहसीलदार विजय पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रपूरचे तहसीलदसर नीलेश गौंड यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते. नायब तहसीलदार गादेवार यांच्याकडे मागील काही महिन्यांपासून तहसीलदार पदाचा प्रभार सोपविण्यात आला होता. आता विजय पवार हे चंद्रपूरचे नवे तहसीलदार असतील. विजय पवार हे वर्धा येथे नायब तहसीलदर होते. राज्यभरात मागील काही महिन्यांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांसह विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहे. काही दिवसांपूर्वी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश निघाले होते. आता तहसीलदारांच्या बदल्या करण्यात येत असून, विजय पवार यांची पदोन्नतीने चंद्रपुरात बदली करण्यात आली आहे.