वाशिम : पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा 2 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, वाशिम येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण/अनुसूचित जाती उपयोजना/ओटीएसपी) सन 2022-23 माहे 31 मार्च अखेर खर्चास मंजूरी प्रदान करण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण/ अनुसूचित जाती उपयोजना/ओटीएसपी), सन 2023-24 या वर्षातील कामांना मंजूरी. सन 2023-24 चे पुनर्विनियोजन, तिर्थक्षेत्रांना क-वर्ग दर्जा प्रदान करणे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2022-23 व सन 2023-24 तिर्थक्षेत्र/जनसुविधा अंतर्गत कामांना मंजूरी. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2024-25 च्या प्रारुप आराखडयास मंजूरी व जिल्हा विकास आराखडा तसेच अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या विषयांवर चर्चा करण्यात येईल.