अकोला:-
१. या दोन महिन्यात जवळजवळ 20 केसेस पेन्शन थांबल्याच्या निदर्शनास आले आहे. ही सर्व मंडळी मला नवीन होती. कोठेतरी हयातीचा दाखला भरलेला असतो. बरोबर की चुकीचा माहीत नसतो. आणि पेन्शन थांबते. आणि मग होते पळापळ. (सत्य घटना)
२. तसेच अनेक जण असे आहेत ज्यांनी ECHS card काढलेच नाही किंवा renew केलेले नाही. आणि एके दिवशी नातेवाईक फोन करतात सिरीयस आहेत ऍडमिट आहेत. हॉस्पिटल चा खर्च आवाढव्य आहे. कार्ड काढायचे आहे. मदत करा. नातेवाईकांना डॉक्युमेंट बद्दल काहीच माहिती नसते. वेळ जात रहातो. खर्च वाढतो.
३. खूप जणांना आपल्याला मिळणाऱ्या अनुदाना संबंधी काहीच माहिती नाही किंवा कोणाच्याच संपर्कात नसल्याने नजरअंदाज करतात. एकजण नवीन माझेकडे आले. असे दिसून आले की त्यांनी रिटायरमेंट नंतर ६-७ वर्ष झाले मुलांचे एज्युकेशन अनुदान घेतलेच नाही. दोन लाखाचे
वरील सर्व वेळोवेळी मीटिंग मधे सांगितले जाते. ग्रुप वर टाकले जाते. तरीही अशा घटना पुढे येत आहेत.
याचे कारण आपल्या कामात इतके मग्न आहेत की मीटिंगला यायचे नाही. ग्रुप मेसेज बघायचे नाहीत. बघितले तरी अंमल करायचा नाही. आपल्या घरच्यांना आपले डॉक्युमेंट बद्दल सांगायचे नाही. अशा मुळे या घटना घडत आहेत. नुकसान करून घेत आहेत.
९०% पेन्शनर च्या पत्नीला व मुलांना PPO, Disch book, ID card, Army नंबर काय असते, Army च्या कोणत्या खात्यात होते हे माहीत नाही. कुठल्याच तारखा माहीत नसतात. स्पर्श बद्दल माहिती नसते आणि यामुळे तारेवरची कसरत होते.
तरी विनंती आहे -
1. संघटनेच्या संपर्कात राहावे.
2. जिल्हा सैनिक कार्यालय च्या संपर्कात राहावे.
3. आपल्या गावात, सैनिकांच्या कुटुंबातील व्यक्तींना माहिती द्यावी. जागरुकता निर्माण करावी
4. ग्रुप वरील मेसेज वाचून अनुकरण करावे. मेसेज पुढे पाठवावेत
5. आधार कार्ड, pan कार्ड, स्पर्श पिपाओ च्या दुरुस्त्या वेळेवर करून घ्याव्यात
6. आपल्या घरातल्यांना फौजी कागदपत्रं दाखवून ठेवावेत
7. अजूनही खूप जणांच्या आधार ला मोबाईल नंबर लिंक केलेला नाही. ते आवश्यक आहे.
8. स्पर्श फाईल तयार करा.
वरील सर्व माहिती
कल्याण संघटक
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगांव यांनी कळवली आहे
आपल्या प्रतिक्रिया द्या....