कारंजा : स्थानिक महाराष्ट्र दिव्यांग संस्था कारंजा,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा, जय भवानी जय मल्हार गोंधळी नवरात्रोत्सव मंडळ कारंजा आणि मराठा सेवा संघ प्राणित संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद कारंजा तर्फे, शनिवार दि . 3 डिसेबर रोजी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून, कार्यक्रमाचे अध्यक्ष हभप श्रीकृष्ण महाराज राऊत, उदघाटक आ. राजेंद्र पाटणी, शिक्षक आ. ऍड किरणराव सरनाईक, आ. लखन मलिक, आ. अमित झनक, जि प अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, अ भा नाट्य परिषद मुंबईचे अध्यक्ष नरेश गडेकर, झाडीपट्टी रंगभूमिच्या महानायिका स्व .स्मिता पाटील पुरस्कार प्राप्त अभिनेत्री आसावरी ताई तिडके, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काळबांडे, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, माजी नगराध्यक्ष उर्मिलाताई इंगोले, भुजंगराव वाळके, राजेंद्र मोडक आदी मान्यवरांच्या हस्ते जागतिक दिव्यांग दिना निमित्त, वृंदावन येथील दिव्यांग महिला किर्तनकार कु . चित्राताई महाराज वाकोडे यांचा भव्य सत्कार करण्यात येईल . त्याचप्रमाणे दुपारी 02:30 वाजता त्यांच्या सुमधूर वाणीतून किर्तन सादर होणार आहे . तरी वैष्णवाच्या या मेळाव्याला जास्तित जास्त हरिभक्तानी उपस्थिती लावण्याचे आवाहन आयोजक संजय कडोळे यांनी केले आहे .