वाशिम : सध्या संपूर्ण भारतात स्वतंत्र लोकशाहीचा सर्वात मोठा मतदानाचा महोत्सव सुरू असतांना,हेतुपुरस्परपणे सर्वच राजकिय पक्ष आणि त्यांच्या उमेद्वारा कडून जाहिराती करीता सर्वाधिक पसंती दूरदर्शन वाहिन्यांच्या खाजगी वाहिन्यांना (इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांना) दिली जात असून,अहोरात्र सेवारत राहून कार्यकर्त्या पासून त्यांना नेते घडविण्यात तसेच जनमाणसात त्यांची ओळख निर्माण करण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या आणि विविध राजकिय पक्षांचा प्रचार प्रसार करणाऱ्या लहानमोठ्या व मुख्यतः ग्रामिण भागातील वृत्तपत्रांना व लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लघुपत्रकारांना, जाहिरातीं मधून हेतुपुरस्परपणे डावलल्या जात आहे.त्यामुळे निश्चितच ही निंदनिय व निषेधार्य बाबं असून त्याबद्दल आम्ही सत्ताधारी आणि इतरही पक्षाचा निषेध करीत आहोत.निवडणूकी करीता लाखो रुपये नव्हे तर करोडो रुपयांचा वारेमाप खर्च करणाऱ्या उमेद्वारांना जर लघुपत्रकारांचे आणि साप्ताहिकाचे भान नसेल. त्यांचे मोल कळत नसेल तर मग त्यांना निश्चितच भविष्यात त्याची फार मोठी किंमत मोजावी लागणार असल्याची भावना दुखवील्या गेलेल्या पत्रकार मंडळींकडून व्यक्त होत आहे.असी संतप्त भावना महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी व्यक्त केली आहे.