कारंजा : गेल्या दहा वर्षापासून कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघ भाजपा पक्षाच्या ताब्यात असून येथे भाजपाचे दिवंगत आमदार स्व.राजेंद्र पाटणी होते. हा मतदार संघ परत एकदा महाविकास आघाडीकडे खेचून आणायचा असेल किंवा कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात पुन्हा महाविकास आघाडीचा आमदार बघायचा असेल.तर महाविकास आघाडीचा उमेद्वारही तगडाच असायला हवा. मतदार संघाचा विकास करणारा विश्वासू विकास पुरुषच असायला हवा.आणि त्या दृष्टीने कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाची मतदार जनता आपला,भावी आमदार म्हणून सुनिल पाटील धाबेकर यांचेकडे पहात आहे.आज संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसह कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील मतदार जनता महायुतीच्या राजकारणाला कंटाळलेली आहे.आज आमचा पोशिंदा शेतकरी संकटात आहे. येथे विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची कोणतीच सोय नाही.सुशिक्षित बेरोजगाराला शासकिय नोकऱ्या नाहीत. मजूर कामगाराच्या हाताला काम नाही. दरवर्षी दररोज कारंजा येथील श्री गुरुमंदिर आणि जैन मंदिराला हजारो नव्हे तर लाखो लोकं भेटी देत असतांना अद्याप तिर्थक्षेत्र विकास आराखड्यात शहराचा समावेश नाही.येथील सोहळ काळवीट अभयारण्याचे काम रखडलेले आहे. कारंजा येथे औद्योगीक वसाहत नसल्याने उद्योग धंदे नाहीत.त्यामुळे कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघ सर्वार्थाने आकांक्षीत मतदार संघ ठरलेला आहे. कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या विकासाचा फार मोठा अनुशेष बाकी आहे. कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी तगड्या विकास पुरुषाची आवश्यकता आहे. मंत्रालया मधून कारंजा मानोरा मतदार संघाच्या विकासाकरीता जास्तित जास्त विकास निधी खेचून आणणाऱ्या आणि अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवून येथील विकासकामे लवकरात लवकर करून घेणारा तगडा उमेद्वार कारंजा मानोरा मतदार संघामध्ये आमदार म्हणून मिळणे अत्यावश्यक आहे. व असा प्रभावी आमदार म्हणून कारंजा मानोरा मतदार संघाचे मतदार सुनिल पाटील धाबेकर यांचेकडून अपेक्षा बाळगून आहेत.त्यामुळे महाविकास आघाडी पक्षाने मतदार संघातील मतदारांचा कौल लक्षात घेऊन,महाविकास आघाडीची उमेद्वारी कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघ हमखास महाविकास आघाडीकडे खेचून आणण्यास समर्थ असणाऱ्या,कारंजा मानोऱ्यातील मतदाराचे लाडके नेतृत्व सुनिल पाटील धाबेकर यांनाच जाहीर करावी. अशी मागणी श्री सुनिल पाटील धाबेकर मित्र मंडळाचे अरविंद लाठीया, प्रदिप वानखडे, संजय कडोळे, अब्दुल राजिक शेख आदींनी महाविकास आघाडी कडे केलेली असून,जर सुनिल पाटील धाबेकर यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही क्ष व्यक्तिला उमेद्वारी चुकून जाहीर झालीच तर कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघ हा महाविकास आघाडीचे हातून आजच गेला.असे समजून घ्यावे. असा अखेरचा इशारा मतदार संघातील राजकिय विश्लेषक संजय कडोळे यांनी दिला आहे.