कारंजा [लाड] कारंजा शहर श्री कामाक्षादेवीचे शक्तिपिठ असून संपूर्ण भारतात सुपरिचित आहे . येथील मातृशक्ती उपासक कठोर नियमांचे पालन करून,श्री नवरात्रोत्सव उत्सव आनंद, सुख, शांतीने तसेच शिस्तीने पार पाडीत असतात. शिवाय कारंजा शहर सर्वधर्मिय एकोप्याचे एकमेव शिस्तप्रिय नगरी म्हणूनही ओळखल्या जाते. त्यामुळे आपल्या शहराचे नाव जगाच्या पाठीवर राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून ओळखल्या जाण्याकरीता, श्री नवदुर्गा विसर्जन मिरवणूकी दरम्यान सर्वांनी व्यसनमुक्त राहून व व्यसनमुक्तीची शपथ घेऊन शांततेने पार पाडावी. व सर्वांनी त्याकरीता एकत्र येऊन धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आनंदोत्साहाने पार पाडावेत. त्याचप्रमाणे शासकिय यंत्रणा व पोलीस प्रशासनाने सुद्धा शांती-संयम ठेवून बंदोबस्त देऊन श्री नवदुर्गा मंडळांना विसर्जन मिरवणूकीत सामंजस्य दाखवित १००% सहकार्य करण्याचे आवाहन विदर्भ लोककलावंत संघटना आणि जय भवानी जय मल्हार गोंधळी नवरात्रोत्सव मंडळाचे संस्थापक , महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त व्यसनमुक्ती लोककलावंत संजय कडोळे यांनी केले आहे.