नांदेडमध्ये शंकरराव चव्हाण सभागृहात आयोजित केलेल्या सावित्री रमाई जयंती महोत्सव पार्श्वभूमीवर त्यागमुर्ती चैतन्यमुर्ती माता रमाई यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक ७ जानेवारी रोजी झालेल्या "सावित्री-रमाई" महोत्सवात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला.सामाजिक क्षेत्रात सतत कार्यरत असणाऱ्या संवेदनशील मनाच्या ,विदेशात राहुनही आपली कर्मभूमी ,आपला समाज त्या प्रती आपले कर्तव्य जबाबदारी लक्षात घेऊन सतत सामाजिक कार्यात मदत करणा-या अंजलीताई आपल्या महिला मंडळाच्या साह्याने नेहमी सामाजिक कार्यात आपली भूमिका बजावत असतात.. त्यांचे कार्य पाहून उपा.अंजलीताई सतिश कानिंदे यांना त्यागमुर्ती माता रमाई पुरस्कार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी जि. परिषदेच्या अध्यक्षा मा.मंगाराणी अंबुलगेकर, आयोजन समितीच्या अध्यक्षा सौ अंजली मुनेश्वर ,माजी महापौर किशोर स्वामी, स्वागताध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, प्रसिद्ध गायिका कविता राम, पोर्णिमा कांबळे,श्री.मुरली हांबर्डे, कोंडदेव हाटकर नियोजन समिती सदस्य उपस्थित होते.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वच क्षेत्रातून ,साहित्यिक, सामाजिक , राजकीय आणि मित्र परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे...