कारंजा (लाड) : रविवार दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह,राष्ट्रभाषा संकुल,शंकर नगर चौक,नागपूर येथे, वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) येथील, सर्पाविषयीची मानवी मनातील भिती घालवून हजारो नाग, मण्यार, अजगर, वगैरे सर्पांना जीवदान देणारे, सर्प मित्र-सर्प अभ्यासक डॉ.राजा गोरे यांचे "सर्पदंश व्यवस्थापन" विषयावरील व्याख्यानाचे व त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचे आयोजिले आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ गौरव प्रतिष्ठान व वनराई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.गिरीश गांधी राहतील.तसेच याप्रसंगी माजी वन बल प्रमुख मा.डॉ.शैलेश टेंभुर्णीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मा.डॉ.राजा गोरे यांचा सत्कार करण्यात येईल.या व्याख्यानाचा सर्व सर्पमित्र,सर्प अभ्यासक तसेच वन विभागातील तत्सम अधिकारी कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी आवर्जून लाभ घ्यावा. असे आग्रहाचे निमंत्रण
वनराई फाऊंडेशन ,नागपूर यांचेकडून देण्यात आल्याचे कारंजा येथील त्यांचे विद्यार्थी असलेले युवा पत्रकार मोहम्मद मिर्झा यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले आहे.