राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची विक्री सर्वत्र सुरू असून अन्न व औषधी प्रशासन विभाग व पोलिसांनी मंगळवारी संयुक्तरित्या कारवाई करून इंदिरानगरमधील शिवाजी चौकातील सचिन दमकोंडावार याच्या घरून सुमारे 10 लाख रुपये किंमतीचा सुगंधित तंबाखू जप्त केला. या कारवाईची भनक लागताच आरोपी सचिन दमकोंडावार फरार झाला.चंद्रपुरात सुगंधित तंबाखूची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे.प्रतिबंधित तंबाखूची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाया होत असल्या तरी या अवैध व्यवसायाला पायबंद लागताना दिसून येत नाही. सचिन दमकोंडावार ह सुगंधित तंबाखूचा मोठा वितरक आहे मंगळवारी मोठ्या शिताफिने त्याच्या घर छापा टाकून हजार किलो सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. त्याची किंमत जवळपास 10 लाख रुप असल्याचे कळते. यात अनेकजण हात लागण्याची शक्यता आहे.