मानोरा/कारंजा : सध्या मान्सूनने परतीच्या पावसाची जोरदार तयारी केलेली असल्याने,पूर्व विदर्भात आणखी चार पाच दिवस तरी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून,पश्चिम विदर्भातील यवतमाळ,अमरावती,अकोला बुलडाणा,वाशिम जिल्ह्यातही अनेक तालुक्यात भाग बदलत चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे.तसेच सदर्हू पाऊस मेघगर्जनेसह विजेच्या लखलखाटात पडण्याचा अंदाज असून,काही भागात विजा पडणार आहेत.असे वृत्त हवामान तज्ञ गोपाल विश्वनाथ गावंडे यांनी दूरध्वनीवरून,महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांचेशी संवाद साधतांना कळवीले आहे. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांनी आपल्या कुटुंबीयांसह गुराढोराची विशेष काळजी घ्यावी. ढगांचा गडगडाट आणि पाऊस सुरु असतांना रानात थांबू नये. विशेषतः हिरव्या झाडाखाली आसरा घेऊ नये.आपली गुरेढोरे बांधू नये.विजेच्या खांबापासून लांब रहावे.स्पर्श करू नये. नदी, नाले,पांदण रस्त्यात पूरसदृश्य पाणी दिसत असल्यास पाण्यामधून,गुरेढोरे,बैलगाड्या, दुचाकी सायकल,मोटारसायकल, कारा इत्यादी वाहने टाकू नये. आजकाल शहरात मुसळधार किवां ढग फुटी सदृश्य पाऊस झाल्यास रस्त्यांना सुद्धा नदीनाल्या प्रमाणे पाणी साचते. तसेच रस्त्याच्या दोन्ही कडेला सांडपाण्याची गटारे असतात त्यामुळे रस्त्याच्या कडेने चालू नये तसेच पाण्यातून वाहने घेऊन जाऊ नये.असे सुरक्षिततेच्या दृष्टिने आवाहन करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेकडून कळविण्यात येत असल्याचे संजय कडोळे यांनी कळवीले आहे.