येथील हितकारिणी हायस्कूल तथा ज्युनिअर कॉलेज येथे हुतात्मा दिनानिमित्त मौन धारण करून देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्याना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राचार्य जय फुलझेले होते तर प्रा. कू.शेंडे ,प्रा. प्रधान, प्रा. धुर्वे, प्रा. शिलार, प्रा. दोनाडकर, प्रा. सहारे, प्रा. सेलोकर, प्रा. कु. मेश्राम, प्रा. कु. हेडाऊ यांचे उपस्थितीमध्ये हुतात्मा दिन पाळण्यात आला. याप्रसंगी देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद चे व त्यांचे त्यागाचे स्मरण करून त्यांच्या कार्याचा उजाळा देण्यात आला. त्यांच्या त्यागाला स्मरून मौन पाळून विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक प्रा. भाग्यवान मेश्राम यांनी तर आभार प्रा. रूमदेव सहारे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी नाना दुमाने यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.