वाशिम (प्रतिनिधी)... वाशिम जिल्ह्यामध्ये पाण्याच्या संचय करण्याचे स्रोत्र कमी आहेत. त्यामुळे निसर्गाच्या माध्यमातून पडणारे पाणी शेती व गावाच्या आजूबाजूला साचवून जलसाठा वाढवण्यासाठी मोठी मदत केवळ जलतारा योजनेच्या माध्यमातून शक्य आहे.जलतारा योजना ही शासनासोबतच जनतेची योजना आहे. जलतारामध्ये शोषखड्डे केल्याने शेतकरी व ग्रामस्थांना लाभ होत असल्याने प्रत्येकानी आपल्या शेतामध्ये व गावातील ई क्लास व एफ क्लास जमिनीवर जलतारा योजना राबवून जलक्रांती करावी. असे आव्हान उपजिल्हाधिकारी तथा कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांनी धनज बु. येथे केले. या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले की, कारंजा तालुक्यातील धनज बु.येथे जिल्हा प्रशासन,ग्रामपंचायत व मातोश्री वैकुंठधाम निवासी स्वर्गीय सौ.स्नेहलता पूनमचंद सोमानी यांच्या स्मृतीपित्यर्थ स्वामी विवेकानंद शिक्षण व व्यायाम प्रसारक मंडळ धनज बु. व सोमानी परिवाराच्या पुढाकाराने स्मशानभूमी जवळील ई क्लास व एफ क्लास जमिनीवर जलतारा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उद्घाटक म्हणून उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे लाभले होते.यावेळी कार्यक्रमाला समाजसेवक पूनमचंद सोमानी,जलसेवक सुभाषराव नानोटे,पवन मिश्रा, मंडळ अधिकारी जयंत कांबळे, पटवारी सतीश दाभाडे,तलाठी प्रवीण उमक ,ग्रामसेवक शाम वेलुरकर ,जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर डोईफोडे ,पंचायत समिती सदस्य मयूर म्हस्के, सरपंच मिलिंद मुंदे, आयोजक स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष निलेश सोमानी, समाजसेवी राजेश सोमानी ,जितेंद्र सोमानी, पार्थ सोमानी ,श्याम सोमानी, मोरेश्वर चांदेकर ,संतोष गुल्हाने जीकर मोटलांनी, मनीष चौकसे, विकास हिवाळे, त्रिलोक बोथरा, टाके, समवेत ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी जलताराकरिता सोमानी परिवाराच्यावतीने एक्कावन्न हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला .सदर कार्यक्रमात सर्व मान्यवरांचा शाल,श्रीफळ,दुपट्टा,टोपी देऊन सत्कार करण्यात आला. जलताराचा शुभारंभ समाजसेवक पूनमचंद सोमानी व उपजिल्हाधिकारी कैलास देवरे यांच्या हस्ते पूजन करून नारळ फोडून रीतसर करण्यात आला. मातोश्री स्वर्गीय सौ.स्नेहलता सोमानी यांच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात आले.समस्त ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमानी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सुभाषराव नानोटे श्याम सवाई व निलेश सोमानी यांनी जिल्हा प्रशासन पूर्ण ताकतीने लोक हिताकरिता जलतारा योजना राबवीत आहे.याला प्रत्येकांनी हातभार लावला तर वाशिम जिल्ह्याचे नाव संपूर्ण देशात अग्रेसर होणार आहे. जलतारा ही योजना स्वतःच्या फायद्याची योजना असून प्रत्येकाने या योजनेमध्ये सक्रियपणे भागीदारी करण्याचे आव्हान केले.सोमानी परिवाराच्या पुढाकाराने एक्कावन्न शोष खड्डे करण्यात आले. शुभारंभ होताच सामाजिक कार्यकर्ते विकास हिवाळे यांनी शेतामध्ये पन्नास जलतारा,मनीष चौकसे यांचेकडे गावामध्ये २५ जलतारा तर कृषीभूषण पुरस्कार प्राप्त प्रगतीशील शेतकरी विनय बोथरा यांच्याशी प्रत्यक्ष उपजिल्हाधिकारी देवरे यांनी संपर्क करून त्यांच्यावर शंभर जलतारा करण्याची जबाबदारी सोपवली त्यांनी ही जबाबदारी स्वीकारल्याने धनज बू येथे जलक्रांती अभियानाला मोठी गती मिळाली आहे .ग्रामपंचायत सरपंच मिलिंद मुंदे यांनीही गावामध्ये जलतारा योजनेला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जि .प. सदस्य डोईफोडे व प.स. सदस्य मस्के यांनी ही जलतारा योजनेमध्ये सहकार्य करण्याचे स्पष्ट केले.सोबतच अनेक समाजसेवक,उद्योजक, शेतकरी सुद्धा या योजनेमध्ये आपले योगदान देणार असल्याने कारंजा तालुक्यामध्ये धनज बु.हे गाव जलतारा गाव म्हणून नावलौकिक प्राप्त करण्याच्या दिशेने पुढे पाऊल टाकत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश सोमानी, सुत्र संचालन शाम सवाई यांनी तर आभार सरपंच मिलिंद मुंदे यांनी मानले. असे वृत्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडे मिळाल्याचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले