कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): दि 7 ऑगष्ट रोजी अन्न दिवस साजरा करण्याच्या मिळालेल्या सूचनेवरून,ग्राम दुधोरा येथील ग्रामपंचायत सरपंचा सौ. ज्योतिबाई बांडे यांच्या अध्यक्षतेखाली,पोलिस पाटील सिता चाटे, सामाजिक कार्यकर्ते दिपक बांडे,पत्रकार ब्रम्हदेव बांड यांच्या उपस्थितीत, स्थानिक मॉ भवानी बचत गट दुधोराच्या रास्त दुकानाकडून, स्थानिक ग्रामस्थांना सन्मानपूर्वक निमंत्रीत करून,रास्त धान्य दुकानच्या ग्राहकांचे स्वागत करीत,त्यांना रास्त धान्याचे वाटप करण्यात आले.
सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिक लाभार्थी मनोहरराव पुंड, विशाखाबाई भगत,रमाबाई ढोके, योगेश नेमाने,सुदाम भगत यांचे रास्त धान्य दुकानाकडून सहर्ष स्वागत करण्यात आले व त्यांना अन्न धान्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पुरवठा विभागाचे संगणक ऑपरेटर सागर राऊत हे स्वतः हजर होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना अन्न दिवसाचे महत्व आणि रॅशन कार्डाच्या लाभाविषयी सविस्तर माहितीपर मार्गदर्शन केले.असे वृत्त पत्रकार ब्रम्हदेव बांडे यांनी कळविले.