कारंजा (लाड) : प्राप्त माहिती नुसार,गुरुवार दिनांक २४ जुलै २०२५ रोजी,सकाळी १०.०० वाजता रामायण हॉटेल कारंजा जवळ,नविन बायपास कारंजा येथे महामार्गावर, स्थानिक शेतकरी एल्गार समितीच्या वतीने,दिव्यांगांचे कैवारी शेतकरी नेते,माजी मंत्री मा. बच्चुभाऊ कडू यांचे समर्थनार्थ त्यांनी दिलेल्या चक्काजाम आंदोलनाला समर्थन म्हणून, संयम व शांततेने शेतकरी कर्जमाफी करिता"रास्ता रोको आंदोलन" करण्यात येणार आहे. त्याकरीता,सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की, रास्ता रोको आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती करण्यात आली आहे.