कारंजा (लाड): व्यापारी बाजारपेठ आणि शैक्षणिक पंढरी,तिर्थक्षेत्र व पर्यटन नगरी असलेल्या,आजूबाजूच्या चारही जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या,कारंजा शहरातील कारंजेकर प्रवाशांचे,न्यायालयीन व व्यापारी कामकाजासाठी दररोज उपराजधानी नागपूर आणि आजूबाजूच्या वाशिम-यवतमाळ-अकोला-अमरावती या चारही जिल्ह्यात दररोज दळवळण असते.आपले कामकाज उशिरा रात्री ०९:०० पर्यंत आटोपल्यानंतर,त्यांना गावाकडे परतायचे असते. त्यामुळे हे प्रवाशी त्या त्या बस स्थानकावर कारंजा परतण्यासाठी जेव्हा पोहोचतात. तेव्हा त्यांना गावी जाण्यासाठी, राज्य परिवहन महामंडळाकडून, रात्री ०८:३० नंतर परतायला बसच नसल्यामुळे त्यांचेवर बाहेरगावच्या त्या त्या बसस्थानकातच रात्र काढावी लागते.त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी १) कारंजा आगाराने प्रत्येक जिल्ह्यासाठी सायंकाळी कारंजमधून बस सोडली. तर ती बस रात्री ०९:०० वाजता प्रत्येक जिल्ह्या मधून कारंजेकर प्रवाशांना परत आणू शकते. २) उपराजधानी कारंजा येथे दुपारी एखादी बस सुरू केली तर रात्री ०९:०० ला, नागपूरहून परतीच्या निघू शकते. तसेच ३) कारंजा येथून पंढरपूर, कारंजा मुंबई, कारंजा भिवंडी इत्यादी बसगाड्या सुरू कराव्यात यासाठी,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ समाजसेवी संजय कडोळे आणि त्यांच्या पत्रकार मित्रांनी स्वतः दि.२१ मे २०२५ रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या कारंजा बस आगाराला आणि शेतकरी निवास कारंजा येथे संपन्न झालेल्या,आमदार श्रीमती सईताई डहाके यांच्या तालुका स्तरिय छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान येथे (जनता दरबारात) लेखी निवेदनाद्वारे प्रवाशांच्या सेवेसाठी,बस सुरू करण्याच्या मागण्या रेटून धरल्या होत्या.परंतु एक महिना उलटूनही कारंजा आगाराकडून सर्वसामान्य प्रवाशांच्या मागण्यांची दखल न घेतल्याने, कारंजा आगाराने प्रवाशांच्या रास्त मागण्यांना केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट होत असल्याची संतप्त भावना प्रवाशांकडून व्यक्त होत असून, सत्ताधारी असो वा महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा शिवसेना अशा कोणत्याच विरोधी राजकिय पक्षांना सुद्धा तळागाळातील,गोरगरीब गरजू प्रवाशांच्या मागण्यांशी सोयरसुतक नसल्याचे स्पष्ट झाल्याची संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ संजय कडोळे यांनी व्यक्त करतांना जनतेच्या रास्त मागण्याची दखल घेत नसतील तर राजकारण्यांचा असून नसून उपयोग काय ? असा प्रश्न विचारला आहे.