आजादी का अमृत महोत्सव" कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे "मेरी मिट्टी मेरा देश" अभियान नगरपरिषद कारंजा च्या वतीने आज दि. 12 ऑगस्ट 2023 रोजी " मेरी मिट्टी मेरा देश" हा उपक्रम अत्यंत हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला.
सदरील समारोहाच्या उद्घाटन पर कार्यक्रम प्रसंगी वाशिम जिल्ह्याच्या मा. जिल्हाधिकारी महोदया श्रीमती भुवनेश्वरी एस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व मा. उपविभागीय अधिकारी ललित कुमार व-हाडे, मा. मुख्याधिकारी दीपक मोरे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला ध्वजारोहण कार्यक्रमाच्या नंतर मा. जिल्हाधिकारी महोदया यांनी "मेरी मिट्टी मेरा देश" या उपक्रमा बाबत माहिती सांगून सर्वांनी नागरिकांनि आपली कर्तव्य पार पाडून सशक्त राष्ट्र निर्माण करण्या करिता सर्वांनी योगदान देण्या बद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक विद्यार्थी यांनी पंचप्राण शपथ घेतली.

यानंतर मा. जिल्हाधिकारी महोदया श्रीमती भुवनेश्वरी एस व इतर मान्यवरांच्या हस्ते कारंजा शहरातील विविध शाळा, विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या भव्य रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. सदर रॅलीमध्ये विविध शाळेतील किमान दोन हजार विद्यार्थ्यांनी सदरील रॅलीमध्ये सहभाग नोंदविला. आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमांतर्गत "मेरी मिट्टी मेरा देश" अभियान नगरपरिषद कारंजा यांच्या वतीने व गो ग्रीन फाउंडेशन, माजी सैनिक संघटना, आदर्श जयभारत संस्था, कारंजा तालुका पत्रकार संघ, महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ, कारंजा पत्रकार विचार मंच, शहरातील सर्व
शाळा महाविद्यालय यांच्या सहकार्याने अत्यंत हर्षउल्हासात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा,शिवाजी महाराज सैनिक सावित्रीबाई फुले,अशा विविध वेशभूषा साकारल्या रॅलीचे प्रमुख आकर्षण महात्मा गांधी व संत गाडगेबाबा यांची वेशभूषा सर्व शहरातील नागरिकांना आकर्षित करीत होती. नगरपरिषद कारंजाच्या वतीने पोहा वेश जवळ रॅली व 75 फूट तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजावर फुलांचा वर्षाव करण्यात आला.
सदर रॅलीचा समारोप नगरपरिषद कारंजा येथे शीलाफलकाच्या अनावरण व आजी-माजी स्वातंत्र्य सैनिकांचा सपत्नीक सत्कार नगर परिषद मुख्याधिकारी, कारंजा तालुका पत्रकार संघ, महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ, कारंजा पत्रकार विचार मंच व गो ग्रीन फाउंडेशन यांचे हस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी मुख्याधिकारी दीपक मोरे सर यांनी उपस्थित सर्व मान्यवराचे आभार व्यक्त करून कारंजा शहर अधिक स्वच्छ व सुंदर करण्यासाठी नागरिकानी आवाहन करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगर परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सदरहू कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन अनुप नांदगावकर सर यांनी केले
आपल्या प्रतिक्रिया द्या....