अकोला:- येथे सर्वांच्या वतीने स्थापन केलेली.डॉ बाबासाहेब आंबेडकर
बहुउद्देशीय सामाजिक संघटना यांच्या वतीने
भीम नगर शांतीनगर या भागातील गुणवंत विद्यार्थी,खेळाडू व सामाजिक कार्यकर्ता यांचा सत्काराचा कार्यक्रम १८ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी आयोजित केला होता.या कार्यक्रमांमध्ये माझा सामाजिक धार्मिक अन्यविरुद्ध आणि अनेक पिढीताना गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याच्या कार्याबद्दल माझे कार्याची दखल घेऊन माझ्या मायभूमीत आमच्या घरात म्हणजेच भीम नगर येथील आंबेडकर चळवळीशी एकनिष्ठ असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनीमाझ्या समाजकार्य पाहून मला प्रमाणपत्र देऊन पंचशीला चा दुपट्टा व गुलाबाचे पुष्प देऊन माझा सत्कार करण्यात आला.
माझ्या सामाजिक कार्याची पावती माझ्या राहत्या घरात मला मिळाली.भीम नगर हे आंबेडकर चळवळीचं केंद्र आहे अकोला जिल्ह्याची राजधानी आहे.इथून निर्माण झालेली आंबेडकर चळवळीचा मी वारसा समोर नेत आहो हा वारसा हे कार्य मी असाच टिकून ठेवला पाहिजे तो समोर नेला पाहिजे अशी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी माझ्याबद्दल इच्छा व्यक्त केली.मी तन-मन-धनाने हा भीम नगरचा वारसा समोर नेणार आंबेडकर चळवळीसाठी शेवटी पर्यंत कार्य करत राहणार.भीम नगर साठी माझा मी जीव सुद्धा देणार हे मी वचन देतो.समाजातील आंबेडकर चळवळीसाठी कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी व समाज बांधवांनी माझा गौरव करून सत्कार केला व माझ्या हातून असेच पुढील समाजकार्य घडो
अशी माझ्यापासून इच्छा व्यक्त केली.मी त्यांचा सर्वांचे
मनापासून धन्यवाद व्यक्त करतो
भीम नगर शांतीनगर या भागातील सर्वांचे असेच प्रेम सहकार्य आशीर्वाद माझ्यावर रहावे हेच तथागता चरणी प्रार्थना करतो.