स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा क्रमांक दोन अंतर्गत स्वच्छता ही सेवा उपक्रम जिल्हा परिषद वाशिम यांनी स्वच्छता पंधरवाडा वाशिम जिल्हाभर आयोजित केला आहे. जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथील विद्यार्थ्यांनी क्लीन इंडियाची मानवी साखळी तयार करून स्वच्छतेचा संदेश दिला.
सर्व शाळांमध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत स्वच्छता हि सेवा उपक्रम अंतर्गत या वर्षीच्या स्वच्छता हि सेवा २०२४ साठी "स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता" हि थीम निश्चित केली आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची भावना जागृत होण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत.या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे मुख्याध्यापक सुरेश राठोड व पर्यवेक्षक गोपाल खाडे व विकास रुईकर यांच्या मार्गदर्शनात कु.दिपाली खोडके,चंद्रशेखर पिसे, सतीश चव्हाण, पुष्पा व्यवहारे,शितल देशमुख,प्रमोद सांगळे,अंकिता किर्दक,या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार केली होती. मानवी साखळीच्या अंतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी "क्लीन इंडिया" अशी आकृती तयार करून स्वच्छतेचा संदेश दिला.विद्यार्थ्यांसाठी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करण्याच्या स्पर्धेचे आयोजन विद्यालयात करण्यात आले आहे.स्वच्छता गीतगायन आयोजित केले आहे. या अनुषंगाने स्वच्छतेची प्रतिज्ञा व हात धुवा प्रात्यक्षिकाचे आयोजन व गीत गायन कार्यक्रम जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे होणार आहे.