ब्रम्हपुरी शहरातील पोदार लर्नं स्कुल मध्ये विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा या उदात्त हेतूने सात दिवसीय उन्हाळी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबीराचे उद्घाटन पोदार लर्नं स्कुलचे संचालक तथा ब्रम्हपुरी नगरपरिषदेचे नगरसेवक डॉ. नितीन उराडे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रशांत उराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तर शिबीराच्या समारोपीय कार्यक्रमाला राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत-पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पोदार लर्नं स्कुलचे मुख्य संचालक नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार हे उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, लहान विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना व कौशल्याला वृध्दींगत करून त्यांच्या भावी जीवनाला कलाटणी देण्यासाठी उन्हाळी शिबिर महत्वाचे ठरत असतात. गायन, नृत्य, चित्रकला, संपर्क साधण्याची कला व व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे, वैयक्तिक स्वच्छता, कृषी, विविध पिके, पर्यावरण, वन, वन्यप्राणी इत्यादी विषयांबद्दल उन्हाळी शिबिरांमधून मिळणारी माहिती ही मुलांच्या विचार व व्यक्तिमत्त्व विकासाला वाव देणारी ठरते असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या सात दिवसीय शिबीरा दरम्यान दररोज विविध प्रकारचे उपक्रम राबवुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उन्हाळी शिबीर घेण्यात आला.
यामध्ये विविध प्रकारचे नवनवीन दगड, माती यांपासून आकर्षक वस्तु तयार करण्याची कलाकृती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले, पौराणिक कथांमधील पात्रांवर भुमिका सादर करायला शिकवण्यात आले, विद्यार्थ्यांमधील साहसी वृत्तीला चालणा देण्यासाठी साहसी खेळ शिकवण्यात आले, विज्ञानावर आधारित जादुचे कार्यक्रम दाखविण्यात आले, आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण जगतांना आपल्याला दिवसभरात दैनंदिन सामान घ्यावं लागते त्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले. घरातील कचरा समजला जाणाऱ्या टाकाऊ वस्तूंपासून घरगुती टिकाऊ वस्तू तयार करणे, विविध सांघिक-एकल खेळ, नृत्य, लाठीकाठी, स्वयंरक्षण कसे करायचे याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.व शिबीरामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.
शिबीरात सहभागी विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिबीराबाबत समाधान व्यक्त केले आहे.
सदर शिबीरातील शिबीरार्थ्यांना सुची मोहता, विनीता मोहता यांनी प्रशिक्षण दिले.
शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ. दर्शना उराडे, मनीषा भुपाल, विनय उराडे, डाॅली तहलियानी, वैशाली उराडे, आरती उराडे, पुजा उराडे, राहुल सातपुते (समन्वयक पोदार स्कुल कार्यालय), स्कुलचे संचालकीय व्यवस्थापक सुमीत चक्रबोर्ती आणि संपूर्ण कार्यालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....