कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : कारंजा शहराची सतत वाढत असलेली लोकसंख्या लक्षात घेऊन,अंदाजे सहा ते सात वर्षापूर्वी कारंजा शहरातील पंचशिल नगर,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या बायपास स्थित आगाराचे जागेवर व अन्य काही ठिकाणी पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम करण्यात आलेले होते. त्याचप्रमाणे मंगरूळ वेशीतून संपूर्ण शहरा मध्ये पाच सहा वर्षापूर्वीच वाढीव पाणीपुरवठ्याकरीता,नव्याने पाईप लाईन सुद्धा टाकण्यात आलेली होती.परंतु आज शहरात पाणी टंचाई जाणवत असतांना मात्र,पाच सहा वर्षापूर्वी पाणीपुरवठा करण्याकरीता, नव्याने टाकलेली पाईपलाईन मात्र अद्याप पर्यंत सुरूच करण्यात आलेली नाही.
त्यामुळे कारंजा शहरातील हजारो नागरिक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण द्वारे मिळणाऱ्या नळाच्या,पिण्याचे पाण्यापासून वंचित आहेत.परंतु मानवी जीवनाकरीता अत्यावश्यक असणाऱ्या या पाणीसमस्येकडे, निवडणुका लागल्या म्हणजे मतांचा जोगवा मागणाऱ्या नेत्यांचे व त्यांच्या पक्षांचे सपशेल दुर्लक्ष्य आहे. या जीवनावश्यक प्रश्नांकडे ना कोणत्या आजी माजी नगरसेवकाचे लक्ष्य आहे.! ना लोकप्रतिनिधीचे लक्ष्य आहे . . ?
पाणीटंचाईचा सामना मात्र करावा लागतो तो कारंजेकर नागरिकांना. तरी निदान आता तरी,मानव जीवनाशी निगडीत असलेल्या ह्या जीवनावश्यक पाणी समस्येकरिता महाराष्ट्र शासनाने निधी उपलब्ध करून देवून वाढीव पाणीपुरवठा योजना त्वरीत सुरु करावी.व या जीवनावश्यक प्रश्नाकडे विकास पुरुष असलेले,कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांनी स्वतः जातीने लक्ष्य देवून,आगामी विधानसभा निवडणूकांपूर्वी,कारंजेकरांच्या भविष्याकरीता वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेण्याची मागणी,कारंजेकर नागरिकांच्या वतीने,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी केली आहे.