महाराष्ट्र राज्यामध्ये महत्त्वपूर्ण असे विकास कार्यात समृद्धी निर्माण करण्याचे कार्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा, नागपूर मुंबई हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग निर्माण झाला आहे . याचा पहिला टप्पा म्हणजे नागपूर ते शिर्डी पर्यंतचा महामार्ग हा जनतेसाठी दि . ११ / १२ / २२ रोजी खुला करण्यात आला तेव्हापासून आज ३० / १२ / २०२२ पर्यंत दररोज सरासरी एक ते दोन अपघात होत असून त्यात मृत्यूंची संख्या डझनाच्या वर झाली आहे. तर जखमींची पण संख्या मोठ्या प्रमाणात आहे . अपघात क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षापासून वाशिम जिल्हा व इतर ठिकाणी कार्य करणारे अपघातग्रस्तांचे मदत केंद्र म्हणून समजल्या जाणारी सर्व धर्म मित्र मंडळ कारंजाचे संस्थापक श्याम रामदास सवाई हे सास कंट्रोल रूम तथा सास शोध व बचाव पथक माध्यमातून क्षणाचाही विलंब न करता मदत कार्य करण्याचा प्रयत्न करीत असतात. श्याम सवाई यांनी दि. ३० /१२/२२ रोजी ईमेलद्वारे मा . मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे व मा . जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वाशिम यांना सास टीमने केलेल्या सर्वेनुसार निवेदन देऊन समृद्धी महामार्गावर अति उत्साहाच्या स्थितीत अति वेगवान गतीने वाहने धावतात. शिवाय अनेक वाहने तर सतत ओवर स्पीड मध्ये दोन ते तीन तास प्रवास करतात . रात्रीसुद्धा सतत प्रवास करतात ते कुठेही ६० किलोमीटर किंवा शंभर किलोमीटर अंतरावर विश्रांती घेत नाहीत . तसेच टायरामध्ये हवेचा दाब वाढवून टायर फुटण्याच्या सुद्धा घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत. काही वाहन योग्य मेंटेनन्स नसलेले भरधाव वेगाने जाऊन शॉट सर्किट उष्णतेने जळतात . अशा वेळेस या वाहनांची गती ही १४० -१५० अशी राहते . यामुळे सास टीमच्या सर्वेनुसार समृद्धी महामार्गावर डोंगराळ भागात १०० ची तर इतर ठिकाणी १२० ची वेग गती ठरवलेली आहे . परंतु बऱ्याच लोकांचा भ्रम आहे की त्या मार्गाने १२० च्या वरच गाडीचं स्पीड मीटर फुटेपर्यंत अलिमिट आहे . अशा भ्रमात वाहन चालवतात व क्षणात त्यांच्या वाहनाच आणि सोबतच मानवी जीविताच होतं ते नव्हतं करतात . त्यात दुसरी बाजू आणखीन अशी की ओवर स्पीड असल्यामुळे अचानक येणारे जनावर सुद्धा धडकतात .
यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत . तरी समृद्धी हायवे वर १२० गतीच्या वर कोणतेही वाहन जाऊ नये . असा प्रतिबंधक असावा .करिता समृद्धी हायवेवर ठरावीक काही अंतरावर स्पीड मापक यंत्र असावे . तसेच वाहन उभे करावीत .जेणेकरून अति वेगवान गतीने जाणाऱ्या वाहनांना ऑनलाइन दंड पडेल व त्याला समजेल की आपल्या जिवाची पर्वा पण केली पाहिजे .आपल्या सोबत असलेल्या लोकांची काळजी घेतली पाहिजे . वाहनधारकांनी समृद्धी हायवेवर ९० ते १०० या स्पीडनेच वाहन चालवावे चुकूनही १२० च्यावर वाहनाची गती जाऊ देऊ नये . अशी जनजागृती व्हावी . तसेच समृद्धी महामार्गाचे मार्गदर्शन देणारे माहिती पत्रक प्रत्येक टोलवर ठेवून त्यात कोणत्या लेनचं काय महत्त्व आहे ? मध्ये थांबायचं असले तर कुठे थांबू शकता . काही अडचण समस्या निर्माण झाली तर तात्काळ कुठे मदत मागायची ? याबाबत जनजागृती करून होणारे अपघात व त्यातील मृत्यू दर कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्या असे श्याम सवाई अध्यक्ष सास शोध व बचाव पथक मुख्यालय वाशिम यांनी आपल्या निवेदनात केली आहे . विकास व समृद्धीसाठी तयार झालेला हा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रकल्प आपल्याला बघता यावं यासाठी जिवंत राहणे महत्त्वाचे आहे . तर वाहन चालकांनी सुद्धा अति आत्मविश्वास न करता वाहनाची गती मर्यादितच ठेवावी . असेही आव्हान श्याम सवाई यांनी केले आहे .महाराष्ट्र शासनाने येत्या काळात समृद्धी हायवेवर स्पीड मापक यंत्र व शासकिय गाड्या तैनात कराव्या अशी विनंती सर्वधर्म मित्र मंडळ कारंजाचे संस्थापक श्याम सवाई यांनी शासनाला निवेदनाद्वारे केलेली असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे, महाराष्ट्र राज्यस्तरिय करंजमहात्म्य पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले आहे .