कारंजा : कार्तिकी एकादशीला वारकरी संप्रदायामध्ये अनन्य साधारण असे महत्व असते. आपल्या जन्मदात्या आई वडीलांची सेवा करण्याची शिकवण देणारा व पालन करणारा आदर्श संप्रदाय म्हणून हिंदुधर्मात वारकरी संप्रदायाकडे सन्मानाने बघीतले जाते . व वारकऱ्यांचे चरणी माऊली म्हणून माथा टेकवीला जातो. अशा वारकऱ्याच्या आनंदोत्सवाला चातुर्मासाला आषाढी एकादशी पासून प्रारंभ होत असतो. चातुर्मासात प्रत्येक वारकरी आपल्या दिनचर्येची सुरुवात प्रातःकालच्या काकडआरती पासून करून, हरिपाठ, भजन, किर्तन, प्रवचन व देवदर्शनात आणि सेवाधर्मात तल्लिन होत असतो. अशा या चातुर्मासाची समाप्ती सुद्धा कार्तिकी एकादशी नंतरच होत असते. त्यामुळे आज दि ४ नोहेंबर २०२२ रोजी कारंजा शहरातील विविध मंदिरा सोबतच, जुने श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, कुंभारपूरा कारंजा, टेलिफोन कॉलेनी स्थित श्री विठ्ठल रखुमाई मंदिर , श्री नृसिह सरस्वती स्वामी महाराज संस्थान आणि विविध वसाहतींमधील सर्वच संत गजानन महाराज मंदिरांमध्ये वारकरी व भाविक भक्त मंडळीची मांदियाळी बघायला मिळाली. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्थानिक जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाचे वारकऱ्यांनी पंचक्रोशीतील सर्वच मंदिराची, अत्यंत भक्तिभावाने विनम्रपणे नगरपरिक्रमा केली असे सेवाधारी दिंडीप्रमुख संजय कडोळे यांनी कळविले आहे.