ब्रम्हपुरी तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडतीतून ठरले. चौगान, गांगलवाडी, पिंपळगांव, खरकाडा, तोरगांव बूज, पारडगांव, आदी नेहमीच राजकीयदृष्ट्या चर्चेत राहणार्या गावांमध्ये सरपंचपदाचे आरक्षण खुल्या गटाला लाभले. यातील काही ठिकाणी महिलांना संधी मिळणार आहे.
सरपंच पदासाठी अनुसूचित जातीसाठी राखीव आरक्षणात चिंचोली बुज (महिला), हळदा (महिला), सावलगाव (महिला), तुलानमेंढा, चिचगाव, चिखलगाव (महिला), पांचगाव (महिला), कोसंबी खडसमारा, कहली, कालेता (महिला व माहेर ग्रामपंचायती समावेश आहे.
अनुसूचित जमातीसाठी सरपंच पदाच्या राखीव आरक्षणात बोरगाव (महिला), अर्हेर नवरगाव, मालडोंगरी, तळोदी खुर्द (महिला), बेलगाव (महिला), व मांगली या ग्रामपंचायती समाविष्ट आहेत.
तसेच नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आरक्षणात रानबोथली, जुगनाळा, चांदली (महिला), लाडज (महिला), गोगाव, बरडकिन्ही (महिला), आक्सापूर (महिला), जवराबोडी, मूई (महिला), मेंडकी, रामपुरी, आवळगाव (महिला), वांद्रा (महिला), बोडदा, मूडझा (महिला), कुडेसावली (महिला), कळमगाव, सायगाव, एकारा (महिला), भूज, व तुकुम या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
तर सर्वसाधारण गटात झिलबोडी, अड्याळ जाणी, चौगान (महिला), बेटाळा, खेडमक्ता, तोरगाव खुर्द (महिला), नान्होरी, दिघोरी, नांदगाव जाणी (महिला), पिंपळगाव भो. (महिला), सोंदरी (महिला), सोनेगाव (महिला), गांगलवाडी, कन्हाळगाव (महिला), बोढेगाव (महिला), भालेश्वर (महिला), निलज, रुई, हरदोली (महिला), सुरबोडी, रणमोचन, खराकाडा (महिला), खंडाळा, उदापूर (महिला), चांदगाव, वायगाव (महिला), बल्लारपूर माल (महिला), चोरटी (महिला), कोथुळना (महिला), चकबोथली, पारडगांव, किन्ही (महिला), लाखापूर, तोरगांव बूज (महिला), कोलारी, किटाळी (महिला), चिचखेडा व मरारमेंढा या ग्रामपंचायती आहेत.
आपल्या प्रतिक्रिया द्या....