चंद्रपूर : जिल्ह्यातील पोलिस ठाणे पडोली अंतर्गत सन २०१७ च्या गुन्ह्यात चोराळा गावातील एक अल्पवयीन मुलीस फूस लावून आरोपीने पळवून नेले. तिच्यावर अत्याचार केला.या प्रकरणात मा.जिल्हासत्र न्यायालयाने सोमवार, २२ ऑगस्ट रोजी आरोपी प्रशांत मोरेश्वर चौधरी ( वय २४ वर्ष रा. चोराळा ) ह्यास विविध कलमान्वये दोषी ठरवून २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास महिला अधिकारी अश्विनी वाकडे ह्यांनी केला होता, न्यायालयामध्ये सरकारी वकील स्वाती देशपांडे व हवालदार मधुराज रामनुजवार ह्यांनी यशस्वी पाठपुरावा केला आहे.