अकोला - केंद्र शासनाने संदर्भ क्र. 1 च्या अधिसूचनेद्वारे परिवहन वाहनांचा योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी विलंब झाल्यास केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 1989 च्या नियम 81 च्या तक्त्यामधील अ.क्र. 11 अनुसार 50 रुपये प्रतिदिवस शुल्काची तरतुद करण्यात आली आहे. यावर मुंबई बस मालक संघटना यांनी रिट याचिका क्र. 11380/2017 अन्वये मा. उच्च न्यायालय मुंबई येथे आव्हानित केली होती. याबाबत मा. न्यायालयाने दि. 10/10/2017 रोजीच्या आदेशान्वये अतिरिक्त शुल्क वसुल न करण्याबाबत स्थगनादेश दिले होते यानंतर मा. उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र. 130/2022 व रिट याचिका क्र. 11380/2017 यांची एकत्रित सुनावणी घेऊन दोन्ही याचिका दि. 02/04/2024 रोजीच्या आदेशान्वये खारीज केल्या. त्यानंतर वाहन योग्यता प्रमाणपत्राची विलंब शुल्क 50 रु. प्रतिदिन घेण्याचे आदेश परिवहन आयुक्ताद्वारे 17 मे 2024 रोजी देण्यात आले आहे. या आदेशानंतर वाहन योग्यता प्रमाणपत्रासाठी 2016 पासून विलंब शुल्क लावण्यात येत आहे. जे ऑटोरिक्षा चालकांसाठी आर्थिकदृष्ट्या अन्यायकारक ठरत आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 15 लाख ऑटोरिक्षा चालक मालक हे आपला उदरनिर्वाह भागविण्यासाठी ऑटोचा व्यवसाय करित आहेत. मात्र, शासनाच्या या जाचक अटीमुळे ऑटोचा व्यवसाय करणे दुरापास्त झाले आहे. प्रत्येक ऑटोचालक आपल्या ऑटोच्या योग्यता प्रमाणपत्राकरिता परिवहन कार्यालयामध्ये जात असतांना त्यांना सन 2016 पासून दररोज 50 रु. प्रमाणे दंड आकारल्या जात आहे तो दंड प्रत्येकाला 60 ते 70 हजारांच्या घरात जात आहे. त्यामुळे ऑटोचालक हा दंड भरण्यास असमर्थ असल्यामुळे सदरचे विलंब शुल्क रद्द करण्याची मागणी ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्राच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अकोल्यामध्ये एकता ऑटो युनियनच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांना प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यामार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे.

या निवेदनावर शाकीर खान, मोहम्मद मुस्तकी, नासीर खान, किशोर सुर्यवंशी, शेख जावेद, राजू खंडारे, गुलाम साबीर, अब्दुल रहेमान, अशफाकभाई लिडर, अनिल इंगळे, धम्मा गवई, संतोष राऊत, जिलानी बेग, शेख कुरबान, दिपक चौधरी, मनोहर अवचार, अहमद खान पठान, गजानन नेव्हाल, मोहम्मद इद्रीस, जाफरभाई, अबरारअली, इमरान मिर्झा, मोहम्मद कासम, अन्वर खान, शेख मेहबुब, शेख मेहबुब, हुसेन अली, सैय्यद इमरान, शेख इसराईल, विजय भगत, विशाल बोबडे, सुरेश धोंडे, शाहरुख खान, मोहम्मद रफीक, असद अली, सुलतान मिर्झा, रियाज खान, संतोष मोरे, अहेमद खान, प्रशांत वगारे, रामा अहीर, मोहम्मद अमीन, फिरोज खान, मोहम्मद आरीफ, शेख शमीर, अय्युब खान, समीर शाह, रऊफ बागवान आदींनी सह्या करुन यावेळी ते प्रामुख्याने उपस्थित होती अशी माहितीशाकीर खान एकता ऑटो युनियन, अकोला यांनी दिली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....